Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समिती बरखास्त करून, प्रशासक नियुक्त करा

APMC Director Board : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २३ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर दोन वर्षांपूर्वी संचालक मंडळ नियुक्त झाले.

Team Agrowon

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २३ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर दोन वर्षांपूर्वी संचालक मंडळ नियुक्त झाले. संचालकांच्या नियुक्तीनंतर समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरकारभार होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी समितीचे संचालक मंडळ बरखास्त करून, प्रशासक नियुक्तीची थेट मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

या मागणीमुळे संचालक मंडळाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. मंत्री मिसाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की गेली अनेक वर्षे बाजार समितीचे कामकाज हे प्रशासकाच्या अधिकाराखाली होते.

यामुळे सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता. मात्र संचालक मंडळ स्थापन झाल्यापासून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये रस्त्यावर बसणारे विक्रेते, अनधिकृत स्टॉल, दुकाने, बेकायदेशीर होर्डिंग्ज यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. परिणामी, सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.

तसेच बाजार आवारातील कचरा विघटनासाठी कोणतेही नियोजन नसल्याने, कचरा सातत्याने साठत आहे. परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे. बाजार समितीचे सुरक्षा रक्षक सामान्य नागरिकांना दमदाटी करत आहेत. तसेच बाजार समितीच्या वतीने व्यापाऱ्यांकडे अतिरिक्त शुल्काची मागणी करत आहेत. यामुळे बाजारातील व्यापारी त्रस्त आहेत.

या सर्व तक्रारींवर माजी पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र त्यावर देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यासर्व बाबींची गंभीर दखल घेत, बाजार समिती बरखास्त करून, प्रशासकांची नियुक्ती करावी असे पत्रात म्हटले आहे. याची प्रत पणनमंत्री जयकुमार रावल यांना देखील देण्यात आली आहे. या मागणीनंतर आता मुख्यमंत्री फडणवीस आणि पणनमंत्री रावल कोणती भूमिका घेतात याकडे बाजार समिती घटकांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gladiolus Farming: डोंगराळ नागालॅंडमध्ये ग्लॅडिओलसची यशस्वी शेती

Fruit Farming: आपल्या फळांची प्रतिमा दुय्यम का?

Cyclone Threat: वेध चक्रीवादळांचा!

Pune Ganesh Festival: पुण्यात गणेशोत्सवाला दिमाखात प्रारंभ

Rice Crop Update: पावसाची उघडीप; भात पिके वाढीच्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT