Chandoli Affected Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Chandoli Affected Farmers : चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास यश, घरबांधणीसाठी ४ कोटींचे अनुदान

Chandoli Farmers : सहा गावांतील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या बदल्यात शासनाकडून पर्यायी जमीन देण्यात येणार होती.

sandeep Shirguppe

Chandoli Sanctuary Victims : चांदोली अभयारण्यग्रस्तांना घर बांधणीसाठी अनुदान तसेच जमीन वाटपाच्या मागण्यांसाठी तब्बल ४० दिवस चाललेल्या ठिय्या आंदोलनानंतर वनविभागाने चांदोली प्रकल्पग्रस्तांना घरबांधणीसाठी ४ कोटी १० लाखांचे अनुदान आले असून, प्रत्येकी पन्नास हजारांच्या पहिल्या हप्त्याचे वाटप सुरू झाले आहे.

सहा गावांतील रहिवासी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या बदल्यात शासनाकडून पर्यायी जमीन देण्यात येणार होती. त्यासाठी गेली तीस वर्षे पाठपुरावा करूनही जमीन मिळाली नाही. तसेच प्रकल्पग्रस्तांना घर बांधणीसाठी अनुदान मिळालेले नाही, त्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली वनविभागाच्या प्रादेशिक कार्यालयासमोर चांदोली प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या आंदोलन केले. त्याची दखल न घेतल्याने प्रकल्पग्रस्त चांदोलीतील आपल्या मूळ गावी चालत निघाले.

बारा दिवस पायपीट करीत चांदोली अभयारण्याजवळ पोहोचल्यानंतर वनविभागाने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली. घर बांधणीसाठी अनुदान देण्याच्या तसेच जमिनी निर्वनीकरण करण्याच्या हालचाली वनविभागाने सुरू केल्या आहेत.

राज्य शासनाकडे झालेल्या पाठपुराव्यानुसार चांदोली प्रकल्पग्रस्तांना घर बांधणीसाठी ४ कोटी १० लाखांचा निधी आला.

तो सहा गावांतील चारशेंवर प्रकल्पग्रस्तांना पहिला हप्ता म्हणून देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांची गावनिहाय यादी बनविण्याचे काम सुरू झाले आहे. चांदोली प्रकल्पग्रस्तांना १ लाख ६५ हजारांचे अनुदान द्यावे, अशी मागणी केली.

मात्र, तेवढा निधी न आल्याने तूर्त पन्नास हजारांचा एक हप्ता देण्यात येत आहे. उर्वरित रक्कम निधी आल्यानंतर देण्यात येईल, अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे जगन्नाथ कुडतकर यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT