Chandoli Dam Kolhapur : प्रकल्पग्रस्त श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून गेले १६ दिवस वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. जमिनीला पाणी आणि घराला १ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहणार, असे प्रकल्पग्रस्तांनी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर शपथ घेतली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
वन विभाग ते दसरा चौक येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला आंदोलक हार घालण्यासाठी गेले होते. तेथे त्यांनी शपथ घेतली. 'आम्ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना साक्षीला ठेवून अशी शपथ घेतो की, गेली २५ वर्षे झाली तरी आम्हा चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांना दहा टक्केही जमीन मिळालेली नाही.
देशाचा विकास व्हावा, पर्यावरण चांगले रहावे, जंगलातील पशुपक्षी प्राणी यांना निर्भयपणे जंगलात चांगले जगता यावे, यासाठी आम्हाला पिढ्यान पिढ्या राहात असलेल्या जनतेला घरे, देव, देवळे, संस्कृती अभयारण्याच्या नावाखाली सरकारने सोडण्यास भाग पाडले.
परंतु आजही आमचे पुनर्वसन कायद्यानुसार सरकार करू शकलेले नाही. ज्यांची पुनर्वसनची जबाबदारी आहे, त्या वन विभागाच्या कार्यालयासमोर ऊन, वारा, थंडी याची तमा न करता बेमुदत आंदोलन करीत आहेत.
१६ दिवसांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केलेली नाही. श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर हे बुधवारी (ता.१४) भेट देऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहेत.
डी. के. बोडके, मारुती पाटील, नजीर चौगुले, दाऊत पटेल, विनोद बडदे, रफिक पटेल, एम. डी. पाटील, पांडुरंग पवार, धोंडीबा पवार व आंदोलक उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.