Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Forecast : नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता

Rain Update : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत शुक्रवारी (ता. ६) हलका पाऊस तर उर्वरित दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता राहील.

Team Agrowon

Nashik News : भारतीय हवामान विभाग, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त हवामान अंदाजानुसार ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत शुक्रवारी (ता. ६) हलका पाऊस तर उर्वरित दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता राहील. आकाश पुढील पाच दिवस ढगाळ राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी होऊन कीड-रोगास अनुकूल वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे.

हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता जिल्ह्यात तसेच घाट क्षेत्रात काही ठिकाणी गुरुवारी (ता. ५) हलक्या पावसाची शक्यता आहे, असे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्र (इगतपुरी) येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्याकडून कळविण्यात आले आहे.

सध्या ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. अगोदरच मागील ऑक्टोबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसामुळे द्राक्षबागांना मोठा फटका बसला. त्यातच आता फुलोरा अवस्थेतील असल्याने गळकुज होण्याची भीती आहे. तर ज्या भागात डाऊनी लक्षणे दिसत होती, त्या ठिकाणी प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे खबरदारी म्हणून शेतकऱ्यांकडून फवारण्या सुरू आहेत. दुबार कांदा रोपवाटिकांमध्येही काही अंशी फटका असून झालेल्या कांदा लागवडीमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तर वेलवर्गीय भोपळा, काकडी पिकात भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.

ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. कांदा पिकावरील मावा, तुडतुडे यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी निंबोळी अर्कची फवारणी करावी, असे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र द्राक्ष, कांदा व भाजीपाला पीक संरक्षण खर्च वाढणार आहे.

जिल्ह्यात पूर्वहंगामी द्राक्ष खुड्यांना गती

जिल्ह्यातील सटाणा भागात पूर्व हंगामी द्राक्ष काढणीला वेग आला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षबागा काढण्यासाठी आहे. मात्र ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती आहे. त्यामुळे काढणीयोग्य बागांमध्ये खुड्यांच्या कामाने गती घेतली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT