Grape  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Disease : पावसामुळे द्राक्षावर डाऊनी, घडकुज होण्याची शक्यता

Grape Management ।। सध्या द्राक्ष बागा फुलोरावस्थेत असून या पावसाचा द्राक्ष बागेला फटका बसण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील काही भागांत जोरदार तर काही भागांत रिपरिप पावसाने मंगळवारी (ता. ७) हजेरी लावली. सध्या द्राक्ष बागा फुलोरावस्थेत असून या पावसाचा द्राक्ष बागेला फटका बसण्याची शक्यता आहे.

परिणामी, बागेवर डाऊनी आणि घडकुज होण्याची शक्यता असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. परंतु रब्बी हंगामातील पिकांना या पावसाने नवसंजीवनी मिळणार असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात मंगळवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले. शिराळा भागात रात्रीपासून पाऊस सुरू झाला होता. शिराळा तालुक्यातील मांगले, बिळाशी पलूस, वाळवा, कवठेमहांकाळ, ढालगाव, कडेगाव तालुक्यासह मिरज तालुक्यातील सलगरे, बेळंकी या भागांत सकाळपासून पावसाला सुरुवात झाली.

या काही गावांत जोरदार पाऊस पडत आहे. तर काही भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे. पलूस तालुक्यात जोरदार पावसाने द्राक्ष बागेत पाणी साचले आहे. आटपाडी तालुक्यातही हलक्या पावसाने हजेरी लावली. दुष्काळी पट्ट्यातील जत तालुक्यातील डफळापूर भागात जोरदार पाऊस झाला. रब्बी हंगामातील पिकांना हा पाऊस पोषक आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील द्राक्ष बागा फुलोरावस्थेत आहेत. काही फुलोरावस्थेच्या पुढे आहेत. कवठेमहाकांळ तालुक्यातील बागा काढणीलाही आल्या आहेत. सध्या फुलोरावस्थेत असलेल्या बागांवर डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती शेतकरी व्यक्त करू लागला आहे.

तर घडकूजही होण्याची शक्यता आहे. परंतु या पावसाने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. दुपारनंतर पाऊस कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. दिवसभर ढगाळ वातावरण होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT