Rain Forecast Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसात खंड पडण्याची शक्यता

Monsoon Update : विदर्भासह तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस शक्य

Team Agrowon

Pune News : पुणे : खानदेश, पूर्व विदर्भाचा काही भाग वगळता राज्याच्या बहुतांश भागात मोसमी वाऱ्यांनी मजल मारली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. १३) विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उद्यापासून (ता. १४) राज्यात पावसात काहीसा खंड पडण्याची शक्यता आहे.

मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर मराठवाडा आणि कोकणात पावसाचा जोर कमी होता. उर्वरित राज्यातही वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडल्या. पावसाची उघडीप असलेल्या भागात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज (ता. १३) कोकणातील विदर्भासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


मध्यम पावसाची शक्यता :
मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
पुणे, नगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT