Tur Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop In Crisis : पावसामुळे श्रीरामपूर परिसरातील तूर, हरभरा, गहू उत्पादक चिंतातूर

Rabi Season : यंदा सोयाबीन व कपाशीने दगा दिल्यानंतर त्यातील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तुरीवर लक्ष केंद्रित केले, तर निव्वळ सोयाबीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी चणा, तर काही भागात गव्हाची पेरणी केली.

Team Agrowon

Yavatmal News : वातावरणात रविवारपासून (ता.२६) बदल होऊन सोमवारी (ता.२७) सकाळी झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे हरभरा, गहू व तूर उत्पादक चिंतातूर झाले आहेत. यंदा सोयाबीन व कपाशीने दगा दिल्यानंतर त्यातील आर्थिक तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी तुरीवर लक्ष केंद्रित केले, तर निव्वळ सोयाबीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी चणा, तर काही भागात गव्हाची पेरणी केली.

तुरीचे भरघोस उत्पादन व्हावे म्हणून सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांनी तुरीला पाण्याचा फेरही दिला. तसेच महागड्या कीटकनाशकांची फवारणी देखील केली. तसेच हरभरा पिकावर बुरशी पडून करपू नये म्हणून बुरशीनाशकाची फवारणी सुद्धा केली,

परंतु रविवारपासून वातावरणात बदल होऊन ऐन थंडीत तापमान वाढले तर रात्रीच्या वेळी ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाचे आगमन झाले. तुरीचे पीक काही भागात फुलांवर असल्याने सोसाट्याचा वारा व पावसामुळे फूलगळ झाली तसेच अनेक भागातील तूरपीक आडवे पडून जमिनीला टेकले.

पेरणी केलेल्या गव्हातही पाणी झाल्याने पिवळे पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सर्व कारणांमुळे खरिपातील तूर व रब्बीतील चणा व गहू या पिकांवर अवकाळीचा परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT