Chana Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : हरभरा पेरणी क्षेत्राने पार केला सरासरीचा टप्पा

Rabi Sowing : या वर्षीच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हरभरा पेरणी क्षेत्राने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे

Team Agrowon

Parbhani News : या वर्षीच्या (२०२४-२५) रब्बी हंगामात परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत हरभरा पेरणी क्षेत्राने सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. शुक्रवार (ता. २९)पर्यंत या दोन जिल्ह्यांमध्ये मिळून हरभऱ्याची २ लाख ५४ हजार ९०७ हेक्टरवर पेरणी झाली होती.

त्यात परभणी जिल्ह्यात १ लाख २७ हजार १६९ हेक्टर (११३.३७ टक्के) आणि हिंगोली जिल्ह्यात १ लाख २७ हजार ३८२ हेक्टर (१०६.०२ टक्के) हरभरा पेरणीचा समावेश आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

परभणी जिल्ह्यात शुक्रवार (ता. २९)पर्यंत २ लाख ७० हजार ७९४ पैकी २ लाख २३ हजार ८६२ हेक्टरवर (८२.६७ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २७ हजार १६९ हेक्टर (११३.३७ टक्के) पेरणी झाली.

ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी ७८ हजार १०१ हेक्टर (६९.०६ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी १७ हजार १४१ हेक्टर (४३.६१टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी ३६४ हेक्टर (१७.४४ टक्के) पेरणी झाली.

करडईची ३ हजार ३७१ पैकी ९२७ हेक्टर (२७.४९ टक्के), जवसाची ११९ पैकी ३२ हेक्टर (२६.८९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी १४.४० हेक्टर (४२.८१टक्के) पेरणी झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात १ लाख ७६ हजार ८९१ पैकी १ लाख ६२ हजार ४७८ हेक्टरवर (९१.८५ टक्के) पेरणी झाली आहे.

त्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख २७ हजार ३८२ हेक्टर (१०६.०२टक्के) पेरणी झाली. ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६९७ असताना प्रत्यक्षात १२ हजार ८९६ हेक्टर (११०.२५ टक्के), गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी २० हजार ३३८ हेक्टर (४७.८५ टक्के).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT