Chana Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Market : हरभरा खरेदी मर्यादा वाढवावी

शासकीय दर ५३३५ रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. यामुळे अनेक शेतकरी शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी प्रयत्न करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon Chana News : खानदेशात हरभरा पीक (Chana Crop) प्रमुख आहे. यंदा उत्पादन जोमात आले आहे. एकरी १० ते ११ क्विंटल उत्पादनदेखील अनेकांना प्राप्त झाले आहे.

परंतु शासकीय हरभरा खरेदी मर्यादा हेक्टरी १३ क्विंटल एवढीच आहे. यामुळे अनेक शेतकरी फक्त निम्माच हरभरा शासकीय खरेदी केंद्रात विक्री करू शकतील, अशी स्थिती आहे.

फक्त देशी, देशी सुधारित (लहान तपकिरी प्रकारातील) हरभऱ्याची खरेदी शासन करणार आहे. काबुली, लहान काबुली हरभऱ्याची खरेदी शासन करणार नाही. यातच यंदा खानदेशात उत्पादन चांगले आले आहे.

अनेकांना कोरडवाहू क्षेत्रात हरभऱ्याचे एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन आले आहे. तर बागायती क्षेत्रात अनेकांनी एकरी नऊ, १०, ११ ते १३ क्विंटल एवढे उत्पादन प्राप्त केले आहे. उत्पादन चांगले आले आहे. परंतु हरभरा विक्री कुठे करावी, असा प्रश्‍न आहे.

कारण बाजारात देशी हरभऱ्याचे दर हमीभावापेक्षा ८०० ते ९०० रुपयांनी कमी आहेत. शासकीय दर ५३३५ रुपये प्रतिक्विंटल, असा आहे. यामुळे अनेक शेतकरी शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी प्रयत्न करीत आहेत.

यामुळे शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी प्रतिसादही मिळत आहे. खानदेशात सात हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी फक्त तीन दिवसात शासकीय केंद्रात हरभरा विक्रीसाठी नोंदणी केली आहे. ही नोंदणी वाढत आहे.

यातच हरभरा खरेदी किती केला जाणार, त्याचा लक्ष्यांक किती, हादेखील मुद्दा आहे. शासनाने खरेदी लक्ष्यांक जाहीर केलेला नाही. परंतु यंदा खानदेशात किमान एक लाख हेक्टर क्षेत्रात उत्पादित हरभऱ्याची खरेदी शासनाला करावी लागेल.

कारण कमाल शेतकऱ्यांचा हरभरा घरातच आहे. खरेदी अद्याप सुरू झालेली नाही. ही खरेदीदेखील लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT