Chana Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Procurement : माटरगाव येथे शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा खरेदीस प्रारंभ

बाजार समितीचे प्रशासक बी.एन.कोल्हे यांच्याहस्ते व बाजार समिती सचिव विलास पुंडकर व खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक मनोहर ताठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

Team Agrowon

Buldhana Market News : शेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (Shegaon Agricultural Produce Market Committee) व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माटरगाव उपबाजार येथे शनिवारी (ता. २५) शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.

बाजार समितीचे प्रशासक बी.एन.कोल्हे यांच्याहस्ते व बाजार समिती सचिव विलास पुंडकर व खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक मनोहर ताठे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.

यावेळी केंद्रावर हरभरा विक्रीसाठी आणलेल्या शेतकरी राजू जयस्वाल (रा. भोनगाव), प्रकाश निंबाळकर (रा. पहूरपुर्णा), माजी सभापती गजाननराव भटकर यांचा बी. एन. कोल्हे, विलास पुंडकर यांनी सत्कार केला. यावेळी अनंत शेगोकार, नागोराव डाबेराव, दीपक कडाळे, रितेश मेटांगे, शिपाई प्रशांत घोडेराव उपस्थिती होते.

या केंद्रावर जवळपास १५०० शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली असून जवळपास दैनंदिन १ हजार क्विंटल शेतमाल मोजण्याचे बाजार समितीचे नियोजन आहे. असे आवाहन सचिव पुंडकर यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT