Raju Shetti Protest agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti Protest : 'स्वाभिमानी'चे उद्या चक्का जाम आंदोलन, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होणार रास्ता रोको

Swabhimani shetkari sanghatana : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार

sandeep Shirguppe

Sugarcane FRP : मागील हंगामातील तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये व यंदाच्या गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल ३५०० रूपये मिळावी. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

यावेळी शेट्टी म्हणाले की, १३ सप्टेंबरपासून ऊस दरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. दि. १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे २२ वी ऊस परिषद झाली. तसेच ७ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडागंणावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. तरीही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही.

आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. मी स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, आदी ठिकाणी रास्ता रोको होणार आहे.

सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यासह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन होणार आहे. राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांना कोणतास रस दिसत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्यासाठी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत.

याचबरोबर कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. साखर कारखाने बंद ठेवू अशी भिती आम्हाला कारखानदारांनी दाखवू नये. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत ऊस तोडी आम्ही सुरू करू देणार नाही.

तसेच आजच्या चक्का जाम आंदोलनात मध्ये समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे, साखर कारखान्यांनी साखरेची वाहने देखील बाहेर पाठवू नये. चक्काजाम आंदोलनाने सरकार व साखर कारखानदारांना जाग आली नाही तर यानंतर होणारा आंदोलनाचा टप्पा अधिक उग्र होणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT