Soyabean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Rate : 'राज्यातील सोयाबीनला हवा तसा भाव मिळेल', पाशा पटेल यांचे आश्वासन

Maharashtra Election 2024 : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष जाहीरनाम्यातून आश्वासनांचा पाऊस पाडत आहेत.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून कांदा, कापूस सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला आहे. यादरम्यान सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकरी नाराज झाले असून संताप व्यक्त करत आहेत. यावरून भाजपचे नेते आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीनच्या भावाबद्दल शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली असून सोयाबीनला हवा तसा भाव मिळेल, असे पटेल यांनी म्हटले आहे. ते परंडा येथील महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित रविवारी (ता.१०) सभेत बोलत होते.

एकीकडे राज्यात कांदा, कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना म्हणावा तसा भाव मिळत नाही. यामुळे शेतकरी नाराज असून त्यांच्या मनात संतापाची लाट निर्माण झाली आहे. जी प्रचाराच्या रणधुमाळीत देखील पाहायला मिळत आहे.

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी, सोयाबीनला भाव कमी मिळत असल्याची कबूली दिली आहे. तर यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल राग असून सोयाबीनचे भावाबद्दलची माहिती केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली आहे. त्यांना भेटून राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितली आहे. यामुळे येत्या ४ दिवसांमध्ये सोयाबीनला हवा तसा भाव मिळणार असे आश्वासन पटेल यांनी शेतकऱ्यांना दिले आहे.

दरम्यान, सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आला आहे. केंद्र सरकारने यंदा (२०२४-२५) सोयाबीन करिता प्रति क्विंटल रू. ४८९२/- इतका हमीभाव घोषित केला आहे. मात्र यापेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे सोयाबीनला ६००० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळावा, अशी मागणी राज्यातील शेतकरी करत आहेत.

शेतकरी देशाच्या प्रगतीचा नायक व्हावा

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (ता. ९) पश्‍चिम विदर्भातील महायुतीच्या सुमारे १५ उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना खर्च कमी करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. देशातील शेतकरी सशक्त होऊन देशाच्या प्रगतीचा नायक बनावा, असे आमचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले होते.

तसेच महाराष्ट्राची ओळख कापूस उत्पादक राज्य असून कापूस प्रक्रिया उद्योगासाठी सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आली आहे. सरकारने सिंचन प्रकल्प, नदीजोड, सूक्ष्म सिंचन, पीकविमा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत अशा विविध पातळ्यांवर काम सुरू केल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT