Sugar Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Rate : 'केंद्राने साखरेचा किमान विक्रीदर चार हजार रुपये करावा'

Hutamta Sugar Factory Sangli : ऊस तोडणी, वाहतूक करणाऱ्या १३ बैलगाडी, अंगद, ट्रॅक्टर, हार्वेस्टर कंत्राटदारांचा सत्कार ४१ व्या गळीत हंगाम सभेत करण्यात आला.

sandeep Shirguppe

Central Government : केंद्राने साखरेचा किमान विक्रीदर चार हजार रुपये करावा, घरगुती व औद्योगिक साखरेचा विक्रीदर वेगवेगळा ठेवावा, अशी आग्रही मागणी हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले. अधिकाधिक ऊस तोडणी, वाहतूक करणाऱ्या १३ बैलगाडी, अंगद, ट्रॅक्टर, हार्वेस्टर कंत्राटदारांचा सत्कार ४१ व्या गळीत हंगाम सभेत करण्यात आला.

ते म्हणाले, "सभेत झालेल्या हंगामाचा आढावा व पुढील हंगामाच्या नियोजनाची चर्चा करतो. उसाची एफ. आर. पी. वर्षाला वाढतेय. मात्र, साखरेची किमान किंमत (एमएसपी) वाढत नाही. त्याचा फटका कारखानदारीला बसत आहे. सध्या कारखानदारीसमोर प्रचंड अडचणी आहेत.

यातून मार्ग काढण्यासाठी सभासद, संचालक, कर्मचारी, तोडणी मजूर, वाहतूक ठेकेदार अशा सर्व घटकांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. कारखाना उभारणीसाठी अल्पभूधारक, कष्टकरी, शेतकऱ्यांनी केलेल्या त्यागाचा विसर पडून चालणार नाही."

संचालक गौरव नायकवडी यांनी ५ लाख टन गाळप झाल्याबद्दल कारखाना अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. हार्वेस्टर यंत्राने ऊस वाया जाण्याचे प्रमाण कमी असल्याने, शेतकऱ्यांनी या यंत्राचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले.

उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर, संचालक, कारखान्याचे माजी अध्यक्ष, संचालक, विरधवल नायकवडी, पदाधिकारी, सभासद, शेतकरी उपस्थित होते. कार्यकारी संचालक समीर सलगर यांनी स्वागत केले. सचिव मुकेश पवार यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT