Weather update  Agrowon
ॲग्रो विशेष

Weather update : उत्तर भारतासह निम्मा महाराष्ट्रही गारठला! पुढीच पाच दिवस थंडीची लाट राहणार

IMD Weather update : गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतासह मध्य आणि उत्तर महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. उत्तर भारतातील दिल्ली, चंदीगढ, उत्तर प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात थंडीची लाट उसळली आहे. ज्याचा परिणाम थेट मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात होत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. तर काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडी कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर उत्तरेकडे होणाऱ्या या बदलांमुळे महाराष्ट्रातील मध्य आणि उत्तरेकडील भाग, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात थंडी वाढलेली आहे. येथे सरासरी तापमान हे तीन अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला असून येथेही पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हा अंदाज हवामान विभागाने मंगळवारी वर्तविला आहे.

देशात उत्तरेकडील राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात झपाट्याने बदल होत असून काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी होत आहे. दरम्यान हवामान विभागाकडून थंडी आणि धुक्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट काही राज्यांना दिला आहे. तसेच पुढील पाच दिवस उत्तर भारतात दाट धुक्याची शक्यतेचा अंदाज विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान काश्मीर खोऱ्यात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे दिल्लीत थंडीची लाट कायम असून येथे थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. ज्यामुळे विमान सेवा आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दाट धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत. यामुळे प्रवाशांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान उत्तर भारतात सुरू असणाऱ्या या थंडीच्या लाटेचा परिणाम दिसून येत आहे. महाराष्ट्रातील मध्य आणि उत्तरेकडील भाग, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात थंडी वाढलेली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. येथे ७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच जळगावात बुधवारी ९.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नीचांकी तापमानाची दुसरी नोंद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Urban Issues: शहरातील नागरी समस्यांकडे मनपाने गंभीरपणे द्यावे लक्ष

Kharif Rain: पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज

Artificial flowers: कृत्रिम फुलांच्या वापरावर बंदी घालावी

Agrowon Podcast: पपई दर टिकून; आले चढ-उतारात, काकडीला उठाव, उडीद व कापूस दर दबावात

SCROLL FOR NEXT