Kaju Seed Subsidy  Agrowon
ॲग्रो विशेष

Kaju Seed Subsidy : काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना

Kaju Subsidy Update : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

योजनेच्या लाभासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांनी काजू बी विक्री पावती, ७-१२ उतारा, आधार संलग्नित बचत बँक खाते क्रमांकासह तपशील, कृषी विभागाच्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इ. तपशीलासह अर्ज महाराष्ट्र राज्य काजू मंडळाकडे ३१ ऑगस्टपूर्वी सादर करावेत, असे आवाहन मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कदम यांनी केले.

राज्यातील काजू उत्पादक या योजनेचे लाभार्थी असतील. त्यासाठी काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या ७-१२ वर काजू लागवडीखालील क्षेत्र/झाडांची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षम काजूच्या झाडांची संख्या व त्यापासून प्राप्त काजू बी उत्पादन हे संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.

काजू उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीकडील नोंदणीकृत परवानाधारक काजू व्यापारी, नोंदणीकृत सहकारी संस्था, खरेदी-विक्री संघ व नोंदणीकृत काजू प्रक्रियादार यांना काजू बीची विक्री केलेली असणे आवश्यक आहे. काजू उत्पादक शेतकऱ्याने विक्री केलेल्या काजूच्या विक्री पावतीवर उपरोक्त नमूद नोंदणीकृत खरेदीदाराचा जीएसटी क्रमांक, शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता असणे आवश्यक आहे.

कोकणातील व कोल्हापूर जिल्ह्यामधील काजू उत्त्पादकांनी राज्य काजू मंडळाच्या मुख्य, विभागीय कार्यालयांकडे व अन्य भागातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचे अर्ज महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संबंधित विभागीय कार्यालयाकडे सादर करून अनुदान योजनेचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही श्री. कदम यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Techniques: कापूस उत्पादनवाढीसाठी सघन लागवड पद्धत

Agri Innovation: कृषी उद्योजकांनी ज्ञान, संशोधनाचा विस्तार करावा

Agriculture Crisis: दिल्लीतील घोषणा अन् शिवारातील वेदना

Milk Adulteration Racket: गोरखधंदा भेसळीचा!

Maharashtra Vanshree Award 2024: ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

SCROLL FOR NEXT