Cashew Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Nut MSP : हमीभाव नसल्याने काजू शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

Cashew Market : काजू बी उत्पादक शेतकरी संकटात आहे. या उत्पादकांना किलोमागे हमीभाव नसल्यामुळे उत्पादन करणे शक्य होत नाहीये.

Team Agrowon

Ratnagiri News : काजू बी उत्पादक शेतकरी संकटात आहे. या उत्पादकांना किलोमागे हमीभाव नसल्यामुळे उत्पादन करणे शक्य होत नाहीये. त्यामुळे गोव्याच्या धर्तीवर रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यांत गावठी काजू बीसाठी किमान १६० रुपये आणि वेंगुर्ला काजू बीसाठी १८० रुपये हमीभाव शासनाने द्यावा, या मागणीसाठी गोळप येथील शेतकरी अविनाश काळे यांनी गुरुवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण केले.

सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत काळे यांनी उपोषण केले. दिवसभरात अनेक शेतकरी, नागरिकांनी काळे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनीही भेट देऊन मागणी पुढे पाठवत असल्याचे सांगितले.

श्री. काळे यांची भेट घेतली असता त्यांनी सांगितले, की रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हजारो काजू बागायतदार आहेत. गेली काही वर्षे गावठी आणि वेंगुर्ला काजू बीला व्यापारी, दलाल प्रति किलोला ९० ते १२० रुपये प्रति किलोच्या दरम्यान आहे.

हा दर सध्या १५० ते १६० रुपये आहे. परंतु तो कायमस्वरूपी राहत नाही. काजू बीचा पुरवठा वाढला की हा दर उतरतो. परंतु शेतकऱ्याची मेहनत मात्र कमी होत नाही. ती मेहनत करावीच लागते. गोव्यामध्ये हमीभाव १५० वरून १७० रुपये करण्यात आला आहे.

त्याचप्रकारे कोकणातही हमी भाव दिला पाहिजे. गेल्या वर्षी काजू बी साठी काजू बोर्डातून प्रतिकिलो दहा रुपये अनुदान शासनाने हंगाम संपताना जाहीर केले होते. शेतकरी वजन खूप होत असल्याने घरी येणाऱ्या खरेदीदाराकडे बिया विकतात. त्यामुळे जीएसटी सोडा पक्की पावती मिळण्यातसुद्धा अडचणी येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT