Sharad Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sharad Pawar : विधायक राजकारणाचा वारसा पुढे न्या

Politics Update : महाराष्ट्राचे विधायक राजकारण घडवणारी पिढी उभी केली. आज तेच राजकारण महाराष्ट्राला पुढे नेईल. त्यासाठी पुढे या, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी (ता. १६) केले.

Team Agrowon

Sangli News : स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारी योगदान देणाऱ्या सांगली जिल्ह्याने स्वातंत्र्योत्तर काळातही स्वाभिमानाचे राजकारण केले. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांनी महाराष्ट्राचे विधायक राजकारण घडवणारी पिढी उभी केली. आज तेच राजकारण महाराष्ट्राला पुढे नेईल. त्यासाठी पुढे या, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी (ता. १६) केले.

येथील ऐतिहासिक स्टेशन चौकात महापालिकेच्या वतीने साकारलेल्या लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी शरद पवार बोलत होते. या वेळी आमदार जयंत पाटील, सुमन पाटील, विक्रमसिंह सावंत,

अनिल बाबर, मानसिंग नाईक, अरुण लाड, शिवाजीराव नाईक, जयश्री पाटील, विशाल पाटील, अजित घोरपडे, पी. आर. पाटील, दिलीप पाटील, अनिता सगरे, शेखर माने, मधुकर भावे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पवार म्हणाले, की १९६० मध्ये बापू काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. तेव्हा मी युवक काँग्रेसच्या पुणे शहर आणि ग्रामीण भागाचे काम करायचो. दिवसभर बापू पुण्यात असतील तेव्हा काँग्रेस भवनात व्यग्र असायचे. सायंकाळी सहानंतर ते भवनच्या कट्ट्यावर बसून आम्हा तरुणांशी गप्पा मारायचे.

महाराष्ट्राची वाटचाल कशी झाली पाहिजे, याची यशवंतरावांची स्पष्ट दृष्टी ते मांडायचे. बापूंचे पुढचे राजकारण विरोधी पक्षात गेले. त्याचवेळी दादा-बापू संघर्षही उभा ठाकला. मात्र, या दोघांनी योग्यवेळी एकत्र येत महाराष्ट्राचे राजकारण पुढे नेले. जयंत पाटील, विश्वजित कदम, मानसिंग नाईक, मधुकर भावे यांची भाषणे झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Talathi Recruitment 2026: तलाठी भरतीत कोतवालांना प्राधान्य, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे संकेत

Native Seed Conservation: देशी वाणांच्या थेट विक्रीतून उभारले अर्थकारण

El Nino Impact: जागतिक शेतीमाल बाजाराला दुहेरी झटका

Fertilizer Black Marketing : खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी देशभरात १.६९ लाख धाडी; महाराष्ट्रात सर्वाधिक कारवाई, लोकसभेत सरकारची माहिती

Gen Z Student Protest: ‘जेन झी’ आंदोलनाच्या निमित्ताने...

SCROLL FOR NEXT