Canal  Agrowon
ॲग्रो विशेष

Canal Project : मीना खोऱ्यातील शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन स्थगित

Farmer Protest : पुणे जिल्ह्यातील वडज धरणाच्या उजवा कालवा उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित मागणीसाठी मीना खोऱ्यातील शेतकरी बांधवांनी पुकारलेले सामूहिक जलसमाधी आंदोलन स्थगित केले आहे.

Team Agrowon

Pune News : जुन्नर तालुक्यातील वडज धरण उजवा कालवा उपसा सिंचन योजनेच्या प्रलंबित मागणीसाठी मीना खोऱ्यातील शेतकरी बांधवांनी स्वातंत्र्यदिनी पुकारलेले सामूहिक जलसमाधी आंदोलन येत्या गांधी जयंतीपर्यंत स्थगित केले असल्याचे मीना खोरे संघर्ष कृती समितीचे सचिव प्रशांत पाबळे यांनी सांगितले.

काचळवाडी येथे जलसमाधी आंदोलनाबाबत १४ ऑगस्ट रोजी शेतकरी व प्रशासनाची बैठक झाली. या वेळी जलसंपदा व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्‍वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. या वेळी आमदार अतुल बेनके, तहसीलदार रवींद्र सबनीस, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक नारायण पवार व शेतकरी उपस्थित होते.

या वेळी खिलारवाडीचे सरपंच दिलीप खिलारी व सामाजिक कार्यकर्ते जयराम खिलारी व रामदास नायकोडी, ज्ञानेश्‍वर काचळे, तसेच बस्ती गावचे सरपंच प्रकाश गिदे, सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, निमदरीच्या सरपंच सुवर्णा धोंडकर, मनसे तालुकाध्यक्ष साईनाथ ढमढेरे तसेच मीना खोरे संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष सुरेश शेणकर, सचिव प्रशांत पाबळे, शरद मनसुख, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मीना खोऱ्यातील शेतकरी बांधवांचा पाण्यासाठी संघर्ष थांबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येत्या २ ऑक्टोबरपर्यंत या योजनेला मंजुरी मिळेल. मंजुरी मिळाली नाही तर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी जलसमाधी आंदोलनात सर्वांत पुढे राहून तुम्हाला न्याय मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आमदार अतुल बेनके यांनी या वेळी बोलताना सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT