Maize Market Agrowon
ॲग्रो विशेष

Maize Production Campaign : मका उत्पादन वाढीसाठी ७८ जिल्ह्यांत अभियान

Maize Production Increase Project : केंद्राने तातडीचा प्रयत्न म्हणून भारतीय मका संशोधन केंद्राला मका लागवडीचे उद्दिष्ट दिले आहेत. ‘इथेनॉल इंडस्ट्रीजच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढ’ हा प्रकल्प सुरू केला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : केंद्राने पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण २० टक्क्‍यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. साखर उद्योगातून इथेनॉल निर्मितीस मर्यादा येत असल्याने सरकारने इथेनॉल निर्मितीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मका उत्पादनवाढीबाबत युद्घ पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्राने तातडीचा प्रयत्न म्हणून भारतीय मका संशोधन केंद्राला मका लागवडीचे उद्दिष्ट दिले आहेत. ‘इथेनॉल इंडस्ट्रीजच्या पाणलोट क्षेत्रात मका उत्पादन वाढ’ हा प्रकल्प सुरू केला आहे. या अंतर्गत देशातील १५ राज्यांतील ७८ जिल्ह्यांत मका उत्पादन वाढविण्याची मोहीम सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना सुधारित वाणांचे बियाणे वाटप करण्यात येत असून सुधारित मका उत्पादनासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. याचे सकारात्मक परिणामही लागवडीत दिसून आहे. मक्‍याच्या लागवडीत वेगाने सुधारणा होत असून १५ जुलैअखेर मका लागवड तब्बल ५८ लाख हेक्‍टरवर पोहोचली आहे. गेल्यावर्षी याच कालवधीत हे प्रमाण ४४ लाख हेक्टर इतके होते. उत्पादन वाढीची सर्व जबाबदारी भारतीय मका संशोधन संस्थेवर सोपविले आहे. या मोहिमेत एफपीओ, शेतकरी, डिस्टिलरी, बियाणे उद्योग यांना सोबत घेऊन काम केले जाणार आहे.

सध्‍या विविध राज्यांत खरिपासाठी मका बियाण्यांचे वाटप सुरू केले आहे. यासाठी पंधरा राज्ये निवडण्यात आली आहेत. यामध्ये आंध्र प्रदेश, आसाम, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ, उत्तराखंड, कर्नाटक आणि हरियाना यांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये आतापर्यंत भारतीय मका संशोधन संस्था यांनी शिफारस केलेले डीएचएम-११७ आणि डीएचएम-१२१, डीएमआरएच १३०८ आदी सुधारित, संकरित वाणांचे सुमारे तीन हजार किलो बियाणे वितरित करण्यात आले आहे.

या बरोबरच अनेक खासगी कंपन्यांचे बियाणेही लागवडीसाठी वापरण्यात येत आहे. एकूण १५०० एकरांवर हा प्रकल्‍प राबविण्याचे उद्दिष्ट आहे. खरीप हंगामामध्ये ११४० एकर क्षेत्रावर लागवड होणार आहे. ऊस व भाताच्या तुलनेत मक्‍याला पाणी कमी लागते. यामुळे कमी पाणी असलेल्या ठिकाणी देखील मका पीक चांगले येऊ शकते. दर चांगले मिळत असल्याने इतर खरिपाच्या तुलनेत मक्यातून शेतकऱ्‍याला चांगला फायदा होण्याची शक्यता असल्याने मका पिकाला प्राधान्‍य देण्‍यात येत असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी

ज्या भागात मका पिकावर आधारित इथेनॉलचे प्रकल्प आहेत. विशेष करुन त्‍याठिकाणी मक्‍याचे उत्‍पादन वाढावे यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम आखण्‍यात आला आहे. इथेनॉल उद्योजकांनी आपल्या पातळीवर शेतकऱ्यांना मका लागवडीसाठी प्रोत्साहित करावे, असा उद्देश केंद्राचा आहे. विविध कंपन्या, मका संशोधन संस्थेचे स्थानिक अधिकारी यांनी संबंधित मका उत्पादकाला मार्गदर्शन करुन मक्याचे उत्पादन वाढण्‍यासाठी अधिकाअधिक प्रयत्न करावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मका संशोधन संस्थेच्‍या सूत्रांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT