Cow Milk Rate agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Rate : गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

Cabinet Meeting : मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Milk Rate : गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सहकारी संस्थाना दुधासाठी सरकार ५ रुपये अनुदान देणार अशी घोषणा करण्यात आली होती. दरम्यान आज याबाबत मंत्रीमंडळ निर्णय झाल्याने गाईच्या दुधाला शेतकऱ्यांना अनुदानासह ३३ ते ३४ रुपये दर मिळण्याची शक्यता आहे.

३२ रुपये दर ठरल्यास २७ रुपये दूध संस्थांना दर द्यावा लागणार आहे तर २८ किंवा २९ रुपये दर ठरल्यास अनुक्रमे ३३ आणि ३४ रुपये दर शेतकऱ्यांना मिळणार आहे. दरम्यान याबाबत मागच्या काही दिवसांपूर्वी राज्याचे दूग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूर अधिवेशनात घोषणा केली होती.

महाराष्ट्रात गाईच्या दूध दरातील कपातीमुळे अनेक जिल्ह्यात याबाबत मोर्चे निघाले होते. दरम्यान यावर तोडगा काढण्यासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ अनुदान देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती. यानंतर खाजगी दूध संस्थाना देण्यात येणार का यावरही संभ्रम निर्माण झाला.

ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवण्यात येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले होते. मात्र, घोषणेनंतर याबाबतचा कोणताही आदेश अद्याप निघाला नव्हता. दरम्यान, आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ७२ टक्के दूध खासगी संस्थांना दिले जाते आणि सरकारनं दिलेलं अनुदान फक्त सहकाराला आहे.

२९ रूपये देणाऱ्यांनाच अनुदान

गाय दुधासाठी प्रतिलिटर किमान २९ रुपये दर देणाऱ्या दूध संघांनाच राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ ट्घ संघाव्यतिरिक्त इतर खासगी आणि काही सहकारी संघांना दूध पुरवठा करणारे हजारो शेतकरी यापासून वंचित राहणार आहेत.

गाय दुधाला दर मिळावा, यासाठी राज्यभर आंदोलन झाले. कोल्हापूर जिल्ह्यानेही यामध्ये पुढाकार घेतला. विविध पक्ष, संघटनांनी रास्ता रोको, दूध टँकर अडवून दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला.

या पार्श्वभूमिवर, राज्य शासनाने गाय दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. हे अनुदान देत असताना प्रत्येक दूध संघाकडून उत्पादकांना किमान २९ रुपये दर देणे बंधनकारक केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT