Lower Terana Upsa Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Scheme : निम्न तेरणा उपसा सिंचनच्या दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता

Agriculture Irrigation : काही वर्षापासून रखडलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या ११३ कोटींच्या दुरुस्ती प्रस्तावाला गुरुवारी (ता. १०) राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

Team Agrowon

Dharashiv News : काही वर्षापासून रखडलेल्या निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या ११३ कोटींच्या दुरुस्ती प्रस्तावाला गुरुवारी (ता. १०) राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या कामामुळे धाराशिव, तुळजापूर, लोहारा आणि औसा तालुक्यातील शेतकऱ्यांसह धाराशिव शहरालाही याचा लाभ होणार आहे, अशी माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

आमदार पाटील म्हणाले, की जलसंपदा विभागाकडे कोणत्याही प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी एकूण बजेटच्या केवळ १० टक्के एवढीच तरतूद असते. निम्न तेरणा उपसा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी ११३ कोटी रुपयांची आवश्यकता होती.

त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या किचकट प्रश्न तयार झाला होता. स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी विभागात समन्वय घडवून प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी त्यांची तांत्रिक मान्यता घेतली. अखेर दुरुस्ती प्रस्तावाला गुरुवारी मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.

त्रुटींची पूर्तता करून अंतिम मान्यतेसाठी दुरुस्ती प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. हक्काचे ४२ दलघमी पाणी अगोदरच आरक्षित करून ठेवलेले आहे. त्यामुळे धाराशिव, तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ होईल, अशी आशा आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT