Grampanchyat  Agrowon
ॲग्रो विशेष

Grampanchyat By-Election : बुलडाणा जिल्ह्यात ७७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

बुलडाणा जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायतींमध्ये ९६ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायतींमध्ये ९६ जागांसाठी पोटनिवडणुकीची (by-election) घोषणा करण्यात आली आहे. यासाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे.

८ सरपंचपदासाठी थेट जनतेत मतदान होणार आहे. निधन, राजीनामा किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या सदस्य आणि सरपंचपदासाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतींमधील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठी १८ मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील ७७ ग्रामपंचायतीमधील ९६ सदस्य व ८ सरपंचपदांचा समावेश आहे.

या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. दाखल झालेल्या अर्जाची छाननी ३ मे रोजी होईल.

उमेदवारी अर्ज ८ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याचदिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

१८ मे रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

या ठिकाणी मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कुठलीही कृती, घोषणा, मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकाऱ्यांनी करू नये व आचारसंहितेचा भंग करू नये, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT