Pomegranate Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Orchard : खात्रीशीर रोपवाटिकांतून डाळिंब रोपांची खरेदी करा

Dalimab Baag : डाळिंब बागांना तेलकट डाग या जिवाणूजन्य रोगापासून वाचविण्यासाठी झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची गरज तसेच रोपांची खरेदी खात्रीशीर रोपवाटिकेतून करावी.

Team Agrowon

Nashik News : डाळिंब बागांना तेलकट डाग या जिवाणूजन्य रोगापासून वाचविण्यासाठी झाडांची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याची गरज तसेच रोपांची खरेदी खात्रीशीर रोपवाटिकेतून करावी. मातृवृक्ष बाग तेलकट डाग, मर रोगमुक्त असल्याची खात्री करावी.

डाळिंबाची लागवड १५ ते १० फूट अंतरावर करावी त्यापेक्षा कमी अंतरावर डाळिंबाची लागवड केल्यास तेलकट डाग रोगाबरोबरच मर रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे प्रतिपादन कृषी विज्ञान संकुल, काष्टीचे उद्यानविद्या विभागाचे सहायक प्रा. डॉ. अमोल विरकर यांनी केले.

पिंपळगाव (ता. मालेगाव) येथे कृषी विज्ञान संकुलतर्फे आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या वेळी डाळिंब उत्पादक शेतकरी गंगाधर पवार, संजय पवार, संतोष निकम, प्रवीण पवार, नितीन कोर, अंकुश पवार आदी उपस्थित होते.

डॉ. वीरकर म्हणाले, की डाळिंब बागांचे आरोग्य वाढीसाठी रासायनिक, जैविक अन् सेंद्रिय खतांसोबतच सूक्ष्म मूलद्रव्याची मात्रा वेळोवेळी झाडांच्या वयानुरूप देणे फायदेशीर ठरते.

बहाराचे नियोजन करताना हवामान, बाजारभाव, मनुष्यबळ, तांत्रिक ज्ञान, जमिनीच्या अन् पाण्याच्या उपलब्धतेनुसार आणि आर्थिक आणि नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची तयारी करावी लागते. एकाच बहाराचे नियोजन केल्यास झाडे रोग आणि किडींना सक्षमपणे तोंड देऊ शकतात. आंबे बहार घेण्यासाठी उन्हाळ्यात पुरेसे पाणी उपलब्ध असले पाहिजे.

ठिबकच्या उपयोगाने मर्यादित पाण्यावर हे पीक जोपासता येते. फळे पक्व होताना जून ते ऑगस्ट महिन्यांत तापमान कमी असते. त्यामुळे गोडी व आकर्षक रंग येतो. फळांचा दर्जा उत्कृष्ट राहतो. रोग व किडीचा प्रादुर्भाव कमी होतो.

आंबे बहारासाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून बागेचे पाणी तोडावे. नवीन लागवड करताना आपल्याच बागेतील उत्कृष्ट झाड निवडून कलमे करणे फायदेशीर ठरू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmer Subcommittee: कांदा उत्पादकांच्या प्रश्नांसाठी उपसमिती; पंधरा दिवसांच अहवाल देण्याचे आदेश

Crop Damage: मे, जूनमध्ये पावसामुळे ५६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कृषी विभागाची माहिती

Goras Bhandar Closure: गोरस भंडारावर कारवाई; दररोज होणाऱ्या ३ हजार ५०० लिटर दूध संकलनावर परिणाम

Offline Fertilizer Purchase: ...तोपर्यंत ऑफलाइन खत खरेदी सुरू ठेवा: शेतकरी संघटना

Banana Rate: खानदेशात केळी दर २९०० रुपयांवर

SCROLL FOR NEXT