Fertilizer
Fertilizer  Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Stock : खरिपासाठी ४३ लाख मेट्रिक टन खतांचा बफर स्टॉक

Team Agrowon

Mumbai News : यंदाच्या खरीप हंगामासाठी (Kharif Season) ४३ लाख १३५ मेट्रिक टन खताचा बफर स्टॉक करण्यात येईल. यामध्ये खरिपासाठी १३.७३५ लाख मेट्रिक टन युरिया, १५.५० लाख मेट्रिक टन संयुक्त खते तर अन्य खतांचा समावेश आहे.

‘‘मागील दोन खरीप हंगामात सरासरी ४२.६६ लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला आहे. येत्या खरिपात युरिया आणि डीएपी खताची कमतरता जाणवणार नाही, यादृष्टीने नियोजन करा. काळाबाजार करणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी आणि दुकानदारांच्या तपासण्या करून कडक कारवाई करावी,’’ असे निर्देश कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नियोजनाच्या बैठकीत दिले.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, सहसचिव गणेश पाटील, संचालक (निविष्ठा व गुणवत्ता) विकास पाटील आदी उपस्थित होते.

२०२० च्या खरिपात ४६.९५, २०२१ मध्ये ४३.३४, २०२२ मध्ये ३७.६८ लाख मेट्रिक टन खतांचा वापर झाला. तर सध्या राज्याकडे २१.३१ लाख मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध आहे.

यंदाच्या खरिपासाठी १३.७३५ लाख मेट्रिक टन युरिया, ४.५० लाख मेट्रिक टन डीएपी तर १५. ५० लाख मेट्रिक टन मिश्र खतांचा साठा मंजूर झाला आहे. ७.५० लाख मेट्रिक टन एसएसपी खताचा साठा मंजूर असून १. ९० लाख मेट्रिक टन एमओपी खतांचा साठा मंजूर आहे.

यंदाच्या शिल्लक साठ्यात ५.३३ लाख मेट्रिक टन युरिया, २.१५ लाख मेट्रिक टन डीएपी, ८. ३९ लाख मेट्रिक टन मिश्र खते, ५.१५ लाख मेट्रिक टन एसएसपी खतांचा समावेश आहे.

खत वापर स्थिती

वर्ष...वापर (लाख मेट्रिक टन)...युरिया...डीएपी...मिश्रखत

२०२०...४६. ९५...१५.३१...५.५५...१७.१२

२०२१...४३.३४...१४.०९...३.४०...१६.५९

२०२२...३७.६८...१३.९४...४.११...१५.१३

ज्या कंपन्या अथवा दुकानदार युरिया अथवा डीएपी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करण्यास कारणीभूत ठरतील, अशांवर कडक कारवाई करण्यात येईल. कृषी विभागाच्या भरारी पथकांमार्फत ठिकठिकाणी तपासण्या कराव्यात. युरिया खताची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित राहील.
अब्दुल सत्तार, कृषिमंत्री.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT