Buffalo  Agrowon
ॲग्रो विशेष

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Buffalo Rearing : नुकतीच संघाने जातिवंत म्हैस संवर्धन व पैदास कार्यक्रम चालू केला आहे.संघाकडून ४०० ते ५०० म्हैशीचा गोठा तयार करण्यात येणार आहे.

Team Agrowon

Kolhapur News : वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधत संघाकडून वारणा दूध संघाच्या जातिवंत म्हैस संवर्धन व पैदास योजनेतून दूध उत्पादकांना म्हैस वितरण करण्यात आले.

अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी संघाच्या वार्षिक सभेत योजनेची घोषणा केली होती. वारणा दूध संघाने माफक दरात पशुवैद्यकीय सेवा, अमृत पशुधन सुरक्षा कवच योजना, वात्सल्य रेडी संगोपन योजना, सायलेज बेल वितरण याबरोबरच इतर अनुदानपर योजना दूध उत्पादकांच्या हितार्थ चालू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना दूध व्यवसाय करण्यास चालना मिळत आहे.

नुकतीच संघाने जातिवंत म्हैस संवर्धन व पैदास कार्यक्रम चालू केला आहे.संघाकडून ४०० ते ५०० म्हैशीचा गोठा तयार करण्यात येणार आहे.या योजनेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी संघाचे गोठ्यावरून मु-हा व मेहसाना जातीच्या म्हैशी माफक दरात खरेदी करता येणार आहेत.

संघाकडून विक्री करण्यात येणाऱ्या म्हशींना विमा संरक्षण मिळणार असून यावेळी संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर संचालक शिवाजी जंगम, अभिजित पाटील, के.आर.पाटील, अकौंटस् मॅनेजर सुधीर कामेरीकर, संकलन व्यवस्थापक अशोक पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी. पाटील, डॉ. एन. एस. वडजे, शरद शेटे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT