Pailpada Research Center and Center of Excellence Agrowon
ॲग्रो विशेष

Mahabeej BT cotton: ‘महाबीज’तर्फे बीटी कापूस बियाणे बाजारात

BT Cotton 124 Variety Launch: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) पैलपाडा संशोधन केंद्र तसेच सेंटर ऑफ एक्स्लन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी वाण महाबीज १२४ या वाणाचे सह विपणनअंतर्गत लोकार्पण करण्यात आले.

 गोपाल हागे

Akola News: महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) पैलपाडा संशोधन केंद्र तसेच सेंटर ऑफ एक्स्लन्स येथे संशोधित झालेल्या संकरित बीटी कपाशी वाण महाबीज १२४ या वाणाचे सह विपणनअंतर्गत लोकार्पण करण्यात आले.

महाबीटी बीजी दोन असे या वाणाचे नाव आहे. हा संकरित बीटी कपाशी वाण उच्च उत्पादन क्षमता असलेला असून, हा वाण कोरडवाहू क्षेत्रासाठीही वरदान ठरणार आहे, असे प्रतिपादन महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक माननीय योगेश कुंभेजकर (भाप्रसे) यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

‘महाबीज’मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. कुंभेजकर होते. या वेळी महाबीजचे संचालक डॉ. रणजित सपकाळ व विभागप्रमुख उपस्थित होते.

महाबीज संशोधित तूर बियाण्यांचे सुद्धा या वेळी लोकार्पण करण्यात आले. तुरीचे एमपीव्ही १०६ या जातीचे बियाणे दक्षिण भारतासाठी प्रसारित करण्यात आलेले आहे. बियाण्यांची मागणी दक्षिण भारतातील तमिळनाडू व कर्नाटक या राज्यांतून प्राप्त झालेली आहे. याचे मूलभूत बियाणे तयार केलेले असून त्याचे वितरण तामिळनाडू व कर्नाटक राज्यांमध्ये होणार आहे.

बियाणे पुरवठ्याची संपूर्ण तयारी झालेली असून त्वरितच बियाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. याप्रसंगी महाबीजचे संशोधन व विकास कार्यामध्ये सहभागी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे डॉ. रणजित सपकाळ संशोधन कार्यासाठी कौतुक केले.

महाबीजचे नवनियुक्त महाव्यवस्थापक विजय देशमुख यांनी बियाण्यांची गरज लक्षात घेऊन त्या पद्धतीने महाबीज संशोधन व विकास करून त्या पद्धतीचे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन महाबीजचे उपमहाव्यवस्थापक गणेश डहाळे यांनी केले. आभार महाव्यवस्थापक डॉ. प्रफुल्ल लहाने यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT