Bribery Case  Agrowon
ॲग्रो विशेष

Bribe Arrest : लाकूड वाहून नेणारे वाहन सोडविण्यासाठी मागितली लाच

Bribery Case : तक्रारदारांनी शेतातील जांभूळ व सादडाचे जुन्या वाळलेल्या झाडाचे लाकूड पिकअपमध्ये (एमएच ०४ एएस ८०७७) भरून गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी घेऊन जात होते.

Team Agrowon

Nashik News : लाकूड वाहून नेणारे पिकअप वाहन पकडून मेरी येथील वन विभागाच्या कार्यालयात ठेवण्यात आले होते, हे वाहन सोडविण्यासाठी वन विभागाचे सहायक वनसंरक्षक व वनपाल यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना मंगळवारी (ता. १८) अटक करण्यात आली. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचखोर सहायक वनसंरक्षक शिरीषकुमार सजन निरभवणे (वय ५४) आणि वनपाल सुरेश कारभारी चौधरी (वय ४४) अशी संशयितांची नावे आहेत. तक्रारदारांनी शेतातील जांभूळ व सादडाचे जुन्या वाळलेल्या झाडाचे लाकूड पिकअपमध्ये (एमएच ०४ एएस ८०७७) भरून गोंदे येथील पेपर मिल येथे विक्रीसाठी घेऊन जात होते.

त्या वेळी सहायक वनसंरक्षक निरभवणे तसेच वनपाल चौधरी व कावेरी पाटील अशांनी ३१ जानेवारीला ही गाडी पकडून मेरी येथील कार्यालयात घेऊन गेले होते. ही गाडी मालासह सोडण्यासाठी निरभवणे यांनी वनपाल चौधरी यांच्यामार्फत दोन हजार रुपयांचा दंड व लाच म्हणून दहा हजारांची मागणी केली.

तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता, विभागाने पडताळणी केली. त्यानुसार मंगळवारी सापळा रचण्यात आला. चौधरी याने दोन हजार रुपये दंड व दहा हजार रोख असे पंचांसमक्ष घेतले.

निरभवणे यांना दूरध्वनी करून दहा हजार रुपये माझ्याकडे मिळालेले आहेत, असे कळविले असता निरभवणे यांनी होकार देत आता गाडीची ऑर्डर घ्यायला पाठवून दे, असे दूरध्वनीवरून सांगितले. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT