Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Pre-Kharif Work : पावसाची उघडीप, पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग

Kharif Season 2025 : गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतींच्या कामाची तयारी सुरू केली असल्याचे चित्र शिवारात पहायला मिळत आहे.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात मेच्या मध्यापासून आठवड्यात मॉन्सूनपूर्व पावसामुळे खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागती खोळंबल्या होत्या. गेल्या आठवड्यापासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतींची कामे होती घेतली आहेत. मशागतींच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान, अथूनमधून पाऊस पडत असल्याने मशागतींना काही प्रमाणात अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी मेपासून मशागतीचे नियोजन केले होते. काही भागात मशागतीची कामे सुरू झाली होती. मात्र, जिल्ह्यातील जत तालुका वगळता सर्व तालुक्यांत मे च्या मध्यापासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सलग अकरा दिवस संततधार पाऊस झाला. यामुळे मशागतींच्या कामाला ब्रेक लागला होता.

त्यामुळे खरिपाच्या पेरा रखडला. दरम्यान शिराळा तालुक्यात धूळ वाफेवर भात पिकाची पेरणी होते. परंतु या तालुक्यातील भात पेरणीही थांबली होती. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतींच्या कामाची तयारी सुरू केली असल्याचे चित्र शिवारात पहायला मिळत आहे. अनेक भागातील शेतशिवारात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाफसा आल्यानंतरच मशागतीची कामे हाती घेतली जाणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आडसाली हंगामातील ऊस पिकांच्या लागवडीसाठी शेतकरी नियोजन करू लागला आहे. पलूस, वाळवा, या तालुक्यात मे च्या मध्यापासून आडसाली ऊस लागवडीस प्रारंभ झाला आहे. या आठवड्यापासून ऊस लागवडीसाठी गती येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

जत तालुक्यात पेरणी योग्य पाऊस झाला आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावात उडीद आणि तूर पिकांच्या पेरण्याही झाल्या आहेत. इतर भागात उडीद आणि तूर पिकांच्या पेरणीसाठी पूर्व मशागती अंतिम टप्प्यात आल्या आहेत. येत्या आठ ते दहा दिवसांत या पिकांची पेरणीला गती येईल. जमिनीची नांगरट, खुरटणी, रोटर मारणे, शेणखतासह जैविक खतांची मात्रा टाकण्याचे काम सध्या युद्धपातळीवर शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.

तीन तालुक्यांत पेरणी लांबणार

जिल्ह्यातील पलूस, मिरज, शिराळा तालुक्यांत अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. पुन्हा शेतात काही प्रमाणात पाणी साचू लागले आहे. परिणामी पेरणीपूर्व मशागतीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या भागात पेरणी लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT