Sugar Season Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Season : ब्राझीलच्या साखरेचा हंगाम धडाक्यात सुरू

Brazil Sugar Season : यंदाचा ब्राझीलचा साखर हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. यंदा ब्राझीलमध्ये साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्यांनी वाढले आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : यंदाचा ब्राझीलचा साखर हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. यंदा ब्राझीलमध्ये साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्यांनी वाढले आहे. एप्रिलच्या पहिल्‍या आठवड्यात साखरेचे उत्‍पादन ७ लाख १० टन इतके झाले आहे. साखर उद्योगाच्या अपेक्षेपेक्षा ही वाढ अधिक आहे. युनिका या संस्‍थेने ही माहिती दिली आहे.

ब्राझीलमध्ये एप्रिलच्या मध्यापर्यंत गेल्या वर्षीच्या १४ टक्के अधिक उसाची तोडणी झाली आहे. ब्राझीलमध्ये गत हंगाम (२०२३-२४) गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत चांगला गेला. भारतासह अन्य देशांमध्ये कमी साखर उत्पादन झाल्याने ब्राझीलच्या साखरेला चांगली मागणी राहिली.

गेल्या वर्षी सुरवातीपासूनच साखरेचे उत्पादन चांगले राहिले. यामुळे निर्यातही चांगली राहिली. जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर चांगले असल्याने याचा सगळा फायदा ब्राझीलला झाला. यंदाही अन्य देशांमध्ये साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने ब्राझीलने यंदाही इथेनॉलपेक्षा साखरेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे.

अनेक कारखाने इथेनॉलपेक्षा साखर निर्मितीला पसंती देत असल्याने यंदाही ब्राझीलमध्ये साखर उत्पादन चांगले राहील, अशी शक्यता आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत साखर हंगाम सुरू होता. ब्राझीलची साखर अखंडपणे जागतिक बाजारपेठेत जात आहे.

भारतासह अन्य कोणत्याही प्रमुख देशातील साखर सध्‍या तरी जागतिक बाजारपेठेत जाण्याची शक्यता नाही. यामुळे सध्‍या तयार होणारी साखर काही दिवसांतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाईल, अशी चिन्हे आहेत. यामुळे यंदाही तेथील साखरेला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे

देशातील नेमके उत्पादन, निर्यातीबाबत अनिश्‍चितता

भारतात यंदा चांगल्‍या पावसाचा अंदाज आहे. यामुळे पुरेसा पाऊस झाल्यास उसाची चांगली वाढ होऊन ऊस व पर्यायाने साखरेचे उत्पादन वाढू शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडी कमी झाल्या आहेत. अनेक ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने सध्या ऊस जगविणे अडचणीचे ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर नेमके किती साखर उत्‍पादन होईल व जादा साखर निर्मिती झाल्यास केंद्र निर्यातीला परवानगी देईल का ? याबाबत कसलाच अंदाज नाही. यामुळे भारतीय साखर नजीकच्या काळात जागतिक बाजारपेठेत किती प्रमाणात जाईल, याबाबत जागतिक बाजारात कसलीच माहिती नाही. यामुळे सध्या तरी ब्राझीलच्या साखरेवरच जगाची भिस्त राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT