AI In Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

AI Sugarcane Farming : ऊस शेतीत ‘एआय’ फायदेशीर

AI Technology : आपल्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते.

Team Agrowon

Sangli News : ‘‘कृषी विज्ञान केंद्र बारामती गेल्या तीन वर्षांपासून कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञावर अभ्यासपूर्ण प्रात्यक्षिके घेत आहे. ऊस शेतीमध्ये अचूक व्यवस्थापन होणेसाठी कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञाचा वापर करणे फायदेशीर आहे,’’ असे मत कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. तुषार जाधव यांनी व्यक्त केले.

कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना व अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावरील शेतकरी चर्चा सत्रात ते बोलत होते. सदर कार्यक्रमप्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. अरुण लाड व बारामती केव्हीकेचे डॉ. तुषार जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.

डॉ. तुषार जाधव म्हणाले, की या तंत्रज्ञानामुळे पाणी व्यवस्थापनासाठी आयओटी मॉइश्चर सेन्सर, स्वयंचलित हवामान केंद्र, उपग्रह प्रणाली आणि ड्रोन इमेजनरी तंत्रज्ञान घटकांचा वापर होणार आहे. तसेच पिकाला पाण्याची गरज, रोग- किडीची ओळख व पूर्वसूचना, पिकाच्या वाढीचा निर्देशांक यांची बिनचूक माहिती मिळणार आहे.

आमदार अरुण लाड म्हणाले, की आपल्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. ऊस विकास विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुख्य मशागत वगळता ऊस लावणीपासून ते तोडणीपर्यंत संपूर्ण निविष्ठा व आर्थिक साहाय्य केले जाते. आता ‘कृत्रिम बुद्धिमता’ याही तंत्रज्ञानाचा वापर ऊस शेतीत शेतकऱ्यांनी करून एकरी उत्पादन वाढवावे.

कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ऊसशेती क्षेत्रात सुरू झाला आहे. अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनीही बदलण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या वापराने ऊस शेतीत क्रांती घडेल.

अरुण पडूळ यांनी उपग्रह प्रणालीच्या ऊस शेतीमधील वापराची चित्ररूप माहिती दिली. तसेच फायलो स्मार्ट इरिगेशनचे प्रमोद चौंडीकर यांनी आयओटी संवेदकाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. या चर्चासत्रास कार्यकारी संचालक अप्पासाहेब कोरे, संचालक, सभासद, ऊसउत्पादक शेतकरी, अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT