Cow Rearing Subsidy  Agrowon
ॲग्रो विशेष

Cow Rearing Subsidy : देशी गायींच्या पालन-पोषण अनुदान योजनेला मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी दिलासा!

Cow Rearing Scheme : महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत व सदर शासन निर्णयामधील नमूद निकषानुसार पात्र गोशाळा, गोसदन पांजरापोळ व गोरक्षण संस्थांनी ५ जानेवारी २०२५ रोजीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.

Team Agrowon

Solapur News : गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे. योजनेसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत व सदर शासन निर्णयामधील नमूद निकषानुसार पात्र गोशाळा, गोसदन पांजरापोळ व गोरक्षण संस्थांनी ५ जानेवारी २०२५ रोजीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, डॉ. विशाल येवले यांनी केले आहे.

या योजनेचा उद्देश व स्वरूप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती, योजनेची अंमलबजावणी, तसेच योजनेचा ऑनलाइन अर्ज व त्यासोबत जोडावयाची आनुषंगिक कागदपत्रे इत्यादी बाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https//schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या ८ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयातील नमूद पात्रतेच्या अटीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यातील अर्ज उपरोक्त संकेतस्थळावर ५ जानेवारीपर्यंत ऑनलाइन सादर करावेत.

महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलेला तसेच ई-मेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, असे आवाहनही जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. येवले यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT