Powder Used to Prepare Adulterated Milk  Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Adulteration : आष्टी तालुक्यात दूध भेसळीचा काळा धंदा उघड

Adulterated Milk Powder Seized : टाकळी आम्ही या आता आष्टी येथे बनावट व भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या ६०० गोण्या अन्नसुरक्षा प्रशासन व पोलिसांनी रविवारी (ता. ४) पहाटे जप्त केल्या.

Team Agrowon

Aashti News : टाकळी आम्ही या आता आष्टी येथे बनावट व भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरच्या ६०० गोण्या अन्नसुरक्षा प्रशासन व पोलिसांनी रविवारी (ता. ४) पहाटे जप्त केल्या. या कारवाईत १९ लाखांचा मुद्देमाल प्रशासनाने ताब्यात घेतला. याप्रकरणी या गावातील अंबादास पांडुरंग चौधरी व रामदास भानुदास चौधरी या दोघांनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

टाकळी आमिया ता. आष्टी येथे रामदास भानुदास चौधरी यांच्या कमलदत्त ॲग्रो फार्मवर दुधाची भेसळ होत असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने शनिवारी (ता. ३) रात्री उशिरा रामदास यांच्या डेअरीवर छापा टाकला.

तिथे भेसळीसाठी वापरली जाणारी पाच गोण्या पावडर, ट्राय सोडियम सायट्रेट दोन गोण्या व पोटॅशियम हायड्रॉक्साइड आदी रसायने आढळले. डेअरी वरील कारवाईनंतर प्रशासनाने रामदास चौधरी यांच्याच कडा येथील गोदामावर मोर्चा वळविला. तेथे पोटॅशियम हायड्रॉक्साइड फ्लेक्स, कॉस्टिक पोटॅशियम फ्लेक्स, ट्राय सोडियम साइट्रेट आदी रसायने जप्त केली.

या प्रकरणातील पुरवठादार अंबादास पांडुरंग चौधरी यांच्या कडा येथील साई दत्त एंटरप्राईजेस येथे छापा टाकून भेसळीच्या पावडरचा मोठा साठा जप्त केला. शेतकऱ्याकडून दूध संकलित करून त्यात भेसळ करून पुढे ते नगर जिल्ह्यात विक्री केले जात असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सं. शी. देवरे आणि सं. कृ. कांबळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत ६ लाख ८७ हजार ६७२ रुपयांची पोटॅशियम हायड्रॉक्साइड फ्लेक्स, कॉस्टिक पोटॅशियम फ्लेक्स, ट्राय सोडियम साइट्रेट आदी रासायनिक पदार्थ तर ६९४२ किलो कॉस्टिक सोडा फ्लेक्स आढळला. अंबादास चौधरी यांनी दूध भेसळीसाठी रासायनिक पदार्थांचा वापर करीत असल्याची कबुली दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Cycle Process: जलशास्त्र : पाण्याच्या प्रवासाचे विज्ञान

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT