Chandrakat Patil On Election Result Agrowon
ॲग्रो विशेष

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Maharashtra Election Result 2024 : राज्यात विधानसभा निवडणूकीचा निकालाचे कल हाती येत असून भाजपने मुसंडी मारली आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप ९० जागांवर आघाडीवर आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काहीच तासांत लागणार आहे. यादरम्यान भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी, राज्यात महायुतीची सत्ता येईल, १६० जागा येतील असाही दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजप-९० जांगावर आघाडीवर आहे.

आयोगाच्या माहितीनुसार भाजप-९० जांगावर आघाडीवर असून शिवसेना (शिंदे) - ५६ अजित पवार गट - ३४ जागांवर पुढे आहे. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस- १९ शिवसेना (उद्धव ठाकरे) १९ आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी ११ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर १५ जागांवर आघाडीवर आहेत.

राज्यात सध्या महायुती आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत असतानाच राज्यात १६० जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच पाटील यांनी, कोथरूडमध्ये फक्त लीड मोजा, आपणच जिंकणार असा विश्वास व्यक्त केला आहे.

तसेच त्यांनी, आपली नाळ येथील मतदारांशी जुळली असून मोठे मताधिक्य मिळेल असा दावा केला आहे. तर निकालानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ते दिल्ली भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यात लोकसभेनंतर केलेली कामे, राज्यात दिलेल्या योजना यांचा फायदा दिसत असून विरोधकांनी चुरस निर्माण केली आहे. पण त्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

मतमोजणीत चंद्रकांत पाटील आघाडीवर

पुण्यातील कोथरूड मधून चंद्रकांत पाटील यांना जवळपास ७००० पेक्षा अधिक मतांनी आघाडी मिळाली आहे. याशिवाय ते पोस्टल मतदानातही आघाडीवर होते. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात शिवनेसा उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे उभे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana e-KYC: ९२ लाख लाडक्या बहिणींना धक्का, 'कॅग'चेही ताशेरे, आदिती तटकरे काय म्हणाल्या?

Ashadhi Wari 2026: माउलींच्या पहिल्या गोल रिंगणाची जय्यत तयारी

Kharif Sowing: लातुरात खरिपाच्या ४० टक्केच पेरण्या; मांजरा धरणात १७.५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा

Irrigation Survey Funding Demand: रिटेवाडी उपसा सिंचनच्या सर्वेक्षणाला निधीची मागणी

Fertilizer Sale Irregularities: मेळघाटात कृषी निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता

SCROLL FOR NEXT