ॲग्रो विशेष

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

पहिल्या फेरीतील आघाडीत पक्षनिहाय आकडेवारीत भाजपनं आघाडी घेतली आहे. भाजपने ९३ जागांवर पहिल्या कलात आघाडी घेतली आहे.

Dhananjay Sanap

महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत सुरुवातीच्या कलानुसार चुरशीची लढत रंगलेली आहे. एकूण २८८ पैकी २७२ मतदारसंघाचे कल समोर आले आहेत. महायुतीने १४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर १३१ जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत. दुपारपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल. परंतु ९ वाजून २१ मिनिटाच्या कलानुसार महायुती आणि आघाडीत रस्सीखेच सुरू आहे.

पहिल्या फेरीतील आघाडीत पक्षनिहाय आकडेवारीत भाजपनं आघाडी घेतली आहे. भाजपने ९३ जागांवर पहिल्या कलात आघाडी घेतली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं २७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने २८ जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाविकास आघाडीतील कॉँग्रेसने ४९, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाने ३७ आणि शरद पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसने ४५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर मनसे २ तसेच इतरने ८ जागांवर आघाडी घेतली आहे.

राज्यात २८८ जागांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान झाले. आज विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता. लाडक्या योजनांसोबत धार्मिक ध्रुवीकरणावरून प्रचारसभांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते. दरम्यान राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांनी निवडणुक लढवली आहे.

सोयाबीनचा मुद्दा

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सोयाबीनच्या दरावरून राजकीय वातावरण तापले होते. महायुती आणि महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी सोयाबीन दरावरून आश्वासनाची उधळण केली होती. त्यामुळे सोयाबीन हा निवडणुकीत महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत होते. त्यामुळे सोयाबीनच्या मुद्द्याचा निकालात काही परिणाम होतो का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Survey: खानदेशात वादळग्रस्त नुकसानीचे पंचनामे अद्याप सुरूच

Cotton Farming: सघन लागवड तंत्रासह काटेकोर व्यवस्थापन

Kharif Crop Competition 2026: ‘खरीप हंगाम २०२६ पीकस्पर्धेत सहभागी व्हा’

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाच्या सर्वेक्षणावरुन सांगलीच्या नागेवाडी, भाग्यनगरमध्ये तणाव, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये धक्काबुक्की

Loan Waiver Protest: सरसकट कर्जमाफीसाठी चांदूरबाजार येथे आंदोलन

SCROLL FOR NEXT