Well Subsidy  Agrowon
ॲग्रो विशेष

Well Subsidy : विहिरींसाठी अनुदानामध्ये भरघोस वाढ

Irrigation Scheme : अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, तर अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यात केवळ खरीप हंगामात पावसाच्या पाण्यावर शेती करण्यात येते. शेतीची कामे आटोपल्यानंतर अनेकजण कुटुंबाची गुजराण करण्यासाठी शहराची धाव घेतात. यावर पर्याय म्हणून सरकारच्या विहीर सिंचनाच्या निरनिराळ्या योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्याच्या अनुदानात भरघोस वाढ करण्यात आली आहे. आता विहिरींसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार आहे.

अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, तर अनुसूचित जातीमधील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते. या योजनांतून पात्र लाभार्थ्यांना विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपये देण्यात येत होते.

आता या रकमेत दीड लाखांची वाढ करून ती चार लाख रुपये करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती-जमातीतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात वाढ व्हावी, शेतीला सिंचनाचा लाभ व्हावा, या हेतूने सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू केली आहे.

अटींमध्ये शिथिलता

विहिरीच्या अनुदानाचा लाभ घेताना तो शेतकरी अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे, याशिवाय त्याच्याकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेला जातीचा दाखला, विहिरीसाठी किमान एक एकर जमीन असणे गरजेचे आहे. त्याच्या नावे सातबारा आठ अ असावा. तसेच वार्षिक उत्पन्नाची अट कमी करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Market Road Issues: विष्णूअण्णा पाटील फळ मार्केटच्या सुविधांवर पाणी

Fake Fertilizer: बोगस खतविक्रीप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

Vanashree Award: भोकणीला वन विभागाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार

Ashadhi Wari 2026: आषाढी वारीसाठी धुळ्यातून २१५ विशेष बस

Agrowon Podcast: हरभरा दरात चढ-उतार ,ज्वारीच्या आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार, शेपू दरात स्थिरतातर केळीच्या आवकेत घट

SCROLL FOR NEXT