APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Bhusawal Market Committee Election : भुसावळ बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा

पणन विभागाच्या सचिवांनी ६ एप्रिलला राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाला बोदवड उपबाजार समितीचे मुक्ताईनगरातून विभाजन ती भुसावळ बाजार समितीला ती संलग्न करण्याबाबत पत्र दिले होते.

Team Agrowon

Bhusawal News : भुसावळ येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आखाडा तापल्यानंतर बोदवड उपबाजार समितीच्या विभाजनाबाबत पणन सचिवांनी आदेश काढल्याने निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे होती तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात निवडणुकीला स्थगिती मिळण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी होऊन याचिका फेटाळण्यात आल्याने भुसावळ बाजार समितीची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पणन विभागाच्या सचिवांनी ६ एप्रिलला राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाला बोदवड उपबाजार समितीचे मुक्ताईनगरातून विभाजन ती भुसावळ बाजार समितीला ती संलग्न करण्याबाबत पत्र दिले होते.

त्यामुळे मुक्ताईनगरसह भुसावळ बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. मात्र त्या संदर्भात माघारीच्या दिवसापर्यंत आदेश निघाले नसल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, शेलवड ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी व शेमळदे (ता. मुक्ताईनगर) येथील विकासो सदस्य संजय पाटील यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल करीत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

निवडणूक झाली तरी निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी कमी असणार असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे मांडण्यात आला होता. मात्र गुरुवारी सुनावणीअंती खंडपीठाने ही याचिका फेटाळल्याची माहिती आहे.माघारीनंतर बाजार समितीतील चित्र स्पष्ट झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E Crop Registration: अमरावतीत ७९ टक्के शेतकऱ्यांचा ऑनलाइन पीक पेऱ्याला खो

Jal Jeevan Mission: जलजीवन योजनेचे काम रखडल्याने टंचाईच्या झळा

Pesticide Company Inspection: ‘ड’ वर्गातील कीडनाशक कंपन्या रडारवर

LPG Cylinder Crisis: एलपीजी सिलिंडरमधून मिळणार केवळ १० किलो गॅस

Milk Adulteration MCOCA Action: दूध भेसळखोरांवर ‘मकोका’चा बडगा

SCROLL FOR NEXT