Sorghum Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Sorghum Crop : ज्वारी पिकातील पाखरे हाकलण्यासाठी लावले भोंगे

ज्वारीचे पीक आता हुरड्याच्या अवस्थेत असून, कोवळ्या कणसावरती पक्षी फेऱ्या मारू लागले आहेत.

Team Agrowon

शहरटाकळी, ता. शेवगाव : शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी दहिगावने परिसरात थोड्या प्रमाणात रब्बीत ज्वारीचे पीक (Rabbi Jowar Crop) घेण्याचा प्रयोग काही शेतकरी करत असून, पाखरांच्या तडाख्यातून ते वाचविण्यासाठी त्यांना हुसकावून लावत असल्याचे चित्र आहे. वन्य प्राण्यांपासून रब्बी पिकाचे (Rabbi Crop) संरक्षण करताना शेतकरी वैतागले आहेत.

ज्वारीचे पीक आता हुरड्याच्या अवस्थेत असून, कोवळ्या कणसावरती पक्षी फेऱ्या मारू लागले आहेत. हिरव्यागार कणसातील हुरड्याचा आस्वाद घेण्यासाठी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे.

त्यामुळे शेतकरी आता ज्वारीचे शेत राखण्यासाठी सकाळ-संध्याकाळ बांधावर बसू लागला आहे. शहरटाकळी परिसरात सरासरीपेक्षा ज्वारीचा पेरा अत्यल्प असून, शेतकऱ्यांनी उसासह कांदा, गहू, हरभरा, मका अशा बागायती पिकांना प्राधान्य दिल्याचे चित्र आहे.

पूर्वी ज्वारी कोणीच रब्बीत घेत नव्हते. परंतु, अलीकडे भातकुडगाव, बक्तरपूर, मजलेशहर, देवटाकळी, शहरटाकळी, भावीनिमगाव, दहिगाव-ने, मठाची वाडी आदी गावांत काही प्रमाणात हा प्रयोग केला आहे. दाणे टिपण्यासाठी पक्षी पिकावरती फेऱ्या मारत आहेत.

पहाटे व सायंकाळी ताटावर बसून हे पक्षी कोवळे दाणे टिपत आहेत. दाणे टिपल्यानंतर किलबिलाट करत आनंद व्यक्त करतात.

यंदा तुरळक ठिकाणीच ज्वारीची पेरणी असल्याने सर्व पक्षी याच पिकावर झडप घेत आहेत. त्यामुळे शेतकरी, आपल्याला किमान सालचंदी तरी व्हावी या अपेक्षेने शेताच्या बांधावर बसून पिकाची राखण करू लागला आहे.

दोन वर्षांत काही शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये ज्वारी घेत हा प्रयोग यशस्वी केला आहे. यात जोंधळा, तसेच संकरित ज्वारीचा समावेश आहे. परंतु कष्ट फार घ्यावे लागतात, असे शेतकरी सांगतात. पहाटे व सायंकाळी चिमण्या दाणे फस्त करतात.

त्यासाठी आरडाओरड करत त्यांना हुसकावून लावावे लागते. अलीकडे बाजारात भोंगे (मोबाईल वरील स्पीकर) आले आहेत. त्यांचा मोठा वापर शेतकरी करत आहेत. शेतात बुजगावणे उभारून संरक्षणाचे प्रयोग केले जातात. सध्या हे पीक जोमदार असल्याचे चित्र आहे.

ज्वारीचे रब्बीतील पीक राखणे अवघड असते. रात्रंदिवस वन्य प्राण्यांना हुसकावून लावावे लागते. रानडुकरे नासधूस करतात, तर सकाळी- संध्याकाळी चिमण्या दाणे टिपतात.
संतोष कांबळे, शेतकरी, शहरटाकळी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT