Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : 'स्वाभिमानी'ने साखर अडवू नये कारखानदार अडचणीत, भोगावतीकडून राजू शेट्टींना निवेदन

Raju Shetti : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मागच्या कित्येक दिवसांपासून ऊस दरावरून आंदोलन सुरू आहे.

sandeep Shirguppe

Raju Shetti News : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मागच्या कित्येक दिवसांपासून ऊस दरावरून आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत साखर आडवणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेतली आहे. दरम्यान स्वाभिमानीने साखर वाहतुकीची वाहने अडवू नयेत.

साखर वेळेवर उचल न झाल्यास कारखान्यासमोरच्या अडचणी वाढतील, अशा आशयाचे निवेदन भोगावती साखर कारखान्याने पदयात्रेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना दिले.

निवेदनातील आशय असा ' केंद्राने गेल्या महिन्यात दिलेला जादा कोटा व ऑक्टोबरमधील २५ हजार क्विंटलचा कोटा १० ऑक्टोबरपर्यंत विक्री करायचा होता. मुदतीत विक्री होऊनही वितरण ठप्प झाल्याने कोटा बुडीत झालेला आहे. ऑक्टोबरसाठी कारखान्यात आलेला बावीस हजार क्विंटलचा कोटा २५ ऑक्टोबरपूर्वी विक्री करणे गरजेचे आहे.

अन्यथा हा कोटाही बुडीत होईल. कर्जावरील व्याजाची परतफेडही होणार नाही. सभासदांना साखर देणे अडचणीचे झाले आहे. कामगारांना पगारासाठी पैसे मिळू शकत नाहीत. नियमाप्रमाणे झालेली साखरविक्री वितरणासाठी व शिल्लक साखर कोटा मुदतीत विक्री होण्यासाठी सहकार्य करावे.' यावेळी संचालक, प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील, सचिव उदय मोरे उपस्थित होते.

उसाला दुसरा हफ्ता ४०० रुपये द्या या मागणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मागच्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान दुसरा जाहीर होत नाही तोपर्यंत स्वाभिमानीकडून आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कारखानदार आणि स्वाभिमानीमध्ये मागच्या काही दिवसांपासून संघर्ष होताना दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Health Tips 2026: वार अडकण्याची कारणे अन् उपाय

UPI Payment: ‘युपीआय’ची दशकपूर्ती

Agriculture Research: आद्य संशोधक शेतकरीच!

Fertilizer Policy: असंतुलित खत धोरणाचा केंद्राने फेरविचार करावा

Solar Energy: सौरऊर्जा आर्थिक प्रगतीची ‘मास्टर की’

SCROLL FOR NEXT