KCR
KCR Agrowon
ॲग्रो विशेष

BRS Party : भारत राष्ट्र समितीची नाशिकपर्यंत धडक

Team Agrowon

Nashik News : तेलंगणा राज्यात (Telangana State) सर्वसामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, आर्थिक मागासवर्ग अशा सर्व घटकांचा विकास करत अवघ्या नऊ वर्षांत तेलंगणा राज्यात बदल घडला आहे.

याच धर्तीवर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) (Chief Minister K. Chandrasekhar Rao) यांचे नेतृत्व मान्य करून माराठवड्यात अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला आहे. तर आता ही सुरू असलेली घोडदौड नाशिक जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे.

विविध सामाजिक, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी भारत राष्ट्र समितीत प्रवेश करत असल्याची माहिती शेतकरी चळवळीचे नेते व भारत राष्ट्र समितीचे समन्वयक नानासाहेब बच्छाव यांनी दिली.

जिल्ह्यातील शेतकरी नेते तथा भारत राष्ट्र समितीचे समन्वयक नानासाहेब बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभाग समन्वयक दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तथा महाराष्ट्र अध्यक्ष माणिक कदम, मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला.

भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागीय समन्वयक दशरथ सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मराठवाडा समन्वयक सोमनाथ थोरात यांच्या उपस्थितीत नाशिक विभागीय पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला.

पक्ष प्रवेशाला भारत राष्ट्र किसान समितीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव कदम यांच्या हस्ते विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भारत राष्ट्र किसान समितीत प्रवेश देण्यात आला. नानासाहेब बच्छाव यांची भारत राष्ट्र किसान समितीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा कदम यांनी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सोमनाथ बोराडे, वैभव देशमुख, नवक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष भगवान सोनवणे, शेतकरी संघर्ष संघटनेचे नांदगाव तालुकाध्यक्ष चंद्रकांत बच्छाव, बाळासाहेब बच्छाव, डॉ. लक्ष्मण साबळे, मनसे वैद्यकीय आघाडीचे माजी जिल्हाप्रमुख डॉ. बिलाल शेख, संपत जाधव, रामचंद्र निकम, शेतकरी संघर्ष संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सचिन कड, शेतकरी संघर्ष संघटनेचे प्रा. मुकुंद आहेर, अभयसिंग सूर्यवंशी, संपत जाधव, संदीप खुटे, प्रा. रोहित पाटील, प्रा. ज्ञानेश्वर बांगर, विक्रांत ढगे, अरुण जाव, विशाल सांगोरे, अमीर शेख, नीरज जैन, प्रहार संघटनेचे जिल्हा संघटक सुभाष आहिरे, राजेंद्र आहीरे, रामकृष्ण जाधव, नीलेश नागरे, सागर थोरात, विनय पवार आदींनी ‘अबकी बार किसान सरकार’ अशा घोषणा देत ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

SCROLL FOR NEXT