Kolhapur Apmc Election Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Market Committee : कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी भारत पाटील

Market Committee : कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे भारत बाबासाहेब पाटील-भुयेकर यांची तर उपसभापतिपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे शंकर दादासो पाटील यांची निवड झाली.

Team Agrowon

APMC News : कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे भारत बाबासाहेब पाटील-भुयेकर यांची तर उपसभापतिपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे शंकर दादासो पाटील यांची निवड झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी पी. एम. मालगावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नूतन संचालकांच्या बैठकीत सभापती-उपसभापतिपदावर गुरुवारी (ता. २५) शिक्कामोर्तब झाले.

नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने १८ पैकी सोळा जागा जिंकत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे.

सत्ताधारी आघाडीचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ, काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आणि मानसिंगराव गायकवाड यांनी केले होते.

बाजार समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी गुरुवारी नूतन संचालकांची बैठक झाली. तत्पूर्वी सर्किट हाऊस येथे सत्ताधारी आघाडीच्या संचालकांची बैठक पार पडली.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय‌. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. याप्रसंगी ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, युवराज पाटील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, प्रदीप पाटील भुयेकर, वैभव सावर्डेकर आदी उपस्थित होते.

तर सभापती-उपसभापती निवडीच्या बैठकीला संचालक राजाराम चव्हाण, प्रकाश देसाई, प्रा‌. शेखर देसाई, बाळासाहेब पाटील, सूर्यकांत पाटील, संभाजी पाटील, पांडुरंग काशीद, संदीप वरंडेकर, सुयोग वाडकर, शिवाजीराव पाटील, नाना कांबळे, पांडुरंग काशीद कुमार आहुजा, संचालिका मेघा देसाई, सोनाली शरद पाटील उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT