Bhagwat Mahajan Agrowon
ॲग्रो विशेष

Udyanratna Award 2025: भागवत महाजन यांना ‘उद्यानरत्न’ पुरस्कार प्रदान

Bhagwat Mahajan: गोरगावले (ता. चोपडा) येथील भागवत काशीनाथ महाजन यांना बिहार कृषी विद्यापीठ आणि स्व. अमितसिंग मेमोरियल फाउंडेशनतर्फे ‘उद्यानरत्न पुरस्कार २०२५’ दिल्लीत प्रदान करण्यात आला.

Team Agrowon

Jalgaon News: गोरगावले (ता. चोपडा) येथील भागवत काशीनाथ महाजन यांना बिहार कृषी विद्यापीठ व स्व. अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन, बिहार यांच्यातर्फे बिहारमधील भागसलपूर येथे आयोजित कार्यक्रमात ‘उद्यानरत्न पुरस्कार २०२५’ नुकताच दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

भारतीय कृषी परिषद उद्यान संचालनालय, दिल्ली व आंध्र प्रदेश कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रीयस्तराचा हा पुरस्कार फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जातो. भागवत महाजन यांचे केळी पिकात मोठे काम आहे.

दिल्ली येथील ‘आयसीएआर’चे माजी फलोद्यान संचालक डॉ. एस. पी. सिंग, आंध्र प्रदेश कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पाठक व अमित सिंग फाउंडेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी बिमला सिंग यांच्या हस्ते बिहार कृषी विद्यापीठातील सभागृहात महाजन यांचा गौरव करण्यात आला.

ते आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करून दर्जेदार केळी उत्पादन घेत आहेत. आपला अनुभव परिसरातील शेतकऱ्यांना कसा उपयोगी येईल, यावर काम करीत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, मोहन चौधरी, शुभम पाटील, प्रशांत राणे आदी शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT