Bajara
Bajara  Agrowon
ॲग्रो विशेष

Bajra cultivation: बाजरीला का म्हणतात हेल्दी फुड? मधुमेही, हृदयरोग्यांसाठी बाजरी का ठरते वरदान?

Team Agrowon

अनुप्रीता जोशी, कु.शितल चव्हाणके

बाजरीमध्ये तंतूमय घटक जास्त असतात. बाजरी हळूहळू पचते आणि दीर्घकाळ ग्लुकोजची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. यामुळे मधुमेहींसाठी ‘हेल्दी फूड' आहे.

हृदय निरोगी: बाजरीच्या उच्च तंतूमय घटकांचा कोलेस्टेरॉल कमी करणारा प्रभाव असतो. त्यामुळे हृदयाच्या रुग्णांसाठी चांगला असतो.बाजरीत चांगले फॅट्स असतात जे कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी फायदेशीर असतात.

ग्लूटेन मुक्त (gluten free) बाजरी ग्लूटेन मुक्त असल्याने, ग्लूटेन सेन्सेटिव्ह एन्टरोपॅथी/सेलियाक रोग असलेले लोक किंवा ते अतिरिक्त वजन कमी करू इच्छिणारे लोक मुक्तपणे खाऊ शकतात.

बद्धकोष्ठता प्रतिबंधित : बाजरीमधील उच्च अघुलनशील सामग्रीमुळे आतड्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

आम्लपित्त,पोटाच्या अल्सरसाठी उपयुक्त : बाजरी पोटातील ॲसिडिटी आणि अल्सर कमी करण्यास मदत करते.

हाडे मजबुतीकरण : बाजरीमध्ये फॉस्फरस चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

रक्तदाब नियंत्रण : बाजरी पोटॅशियमने समृद्ध असल्याने आपल्या शरीरातून अतिरिक्त सोडियम बाहेर काढण्यास मदत करते.यामुळे शरीरातील सोडियम-पोटॅशियमचे प्रमाण कायम राहते. रक्तदाबही कमी होतो.

भरपूर अँटी-ऑक्सिडंट : बाजरीच्या सेवनाने शरीरातील फ्री रॅडिकल्सचे (free radicals) प्रमाण कमी होते. लवकर वृद्धत्व, अल्झायमर रोग आणि पार्किन्सन्सला सारख्या रोगांचा प्रतिबंध होतो.

बाळासाठी अन्न : बाजरी सहज पचते. पोटासाठी हलकी असते. त्यामुळे बाळांच्या आहारात वापर करावा. विशेषत: स्तनपानाच्या काळात आणि नंतरही बाजरीचा आहारात समावेश असावा.

कर्करोग नियंत्रण : बाजरी पोटाला अल्कधर्मी बनवते. त्यामुळे कोलन कॅन्सरचा धोका कमी होतो. लोह आणि फॉलिक अॅसिडचे (folic acid) प्रमाण जास्त असल्यामुळे बाजरी हे गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांसाठी आरोग्यदायी आहार आहे.

(सहाय्यक प्राध्यापक, अन्नतंत्र महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

Bajari Crop : खेड तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात बाजरी फुलोऱ्यात

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीतील २५ माजी संचालकांवर गुन्हे

Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

Tur Market : पूर्व विदर्भात तूर दरात काहिसा दबाव

SCROLL FOR NEXT