Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : बारामतीत ९० मिलिमीटर पावसाची नोंद

Rain News : राज्यात मॉन्सून दाखल होत असताना पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस वाढला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात मॉन्सून दाखल होत असताना पुणे जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस वाढला आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत बारामती, सणसर येथे सर्वाधिक ९०.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पूर्व पट्ट्यात पाऊस पडल्यानेशेतकऱ्यांनी खरिपाच्या तयारीस सुरुवात केली आहे.

सध्या सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असून दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक स्थिती तयार होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे उकाड्यापासून दिलासा मिळत आहे.

काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे उन्हाळी पिकांचे काही प्रमाणात नुकसान होत असून शेतकऱ्यांपुढे ऐन खरिपाच्या तोंडावर अडचणी वाढत आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यातही हलका पाऊस पडत आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी भात रोपवाटिकेची तयारी सुरू केली आहे.

पूर्व पट्ट्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर या भागांत पावसाचा जोर अधिक होता. अनेक ठिकाणी ५० मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. बारामतीतील सुपा येथे ६५.८, तर मोरगाव येथे ६५.० मिलिमीटर पाऊस पडला. दौंडमध्येही ६८ मिलिमीटर पाऊस पडला. पुरंदरमधील सासवड, भिवंडी, जेजुरी या भागांत हलका, तर अनेक भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. मावळातील काले, कार्ला, खडकाळा, लोणावळा, शिवणे भागांतही हलका पाऊस पडला.

हवेलीतील खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली भागांत हलका पाऊस पडला. मुळशीतील पौड, माले, मुठे, घोटावडे, वेल्ह्यातील विंझर, आंबवणे, जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, राजूर, आपटाळे, ओतूर, खेडमधील चाकण, राजगुरुनगर, कुडे, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडूस, आंबेगावमधील पारगाव, मंचर, शिरूर टाकळी, मलठण, तळेगाव, कोरेगाव, पाबळ, शिरूर भागांत पावसाच्या सरी कोसळल्या.

शुक्रवारी (ता.७) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला मंडसनिहाय पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

हवेली - पुणे वेधशाळा १३.३, केशवनगर १३.३, कोथरूड १५.८,

मुळशी - थेरगाव १८.५, पिरंगुट १२.८

भोर - भोर १३, भोलावडे १६.३, नसरापूर १८, किकवी २२.३, वेळू, आंबवडे १४.५, संगमनेर १३, निगुडघर १२.३

मावळ - वडगाव मावळ ११.५, तळेगाव ११.५,

वेल्हा - पानशेत १२.८,

जुन्नर - डिंगोरे १२.५,

खेड - वाडा १६.५, पाईट ३१.८,

आंबेगाव - घोडेगाव २६.८, आंबेगाव ५३.३,

शिरूर - वडगाव १४.८, न्हावरा १८.३, रांजणगाव १२.३,

बारामती - बारामती ९०.५, माळेगाव १०.५, पणदरे २८.०, वडगाव ४८.५, लोणी ५०.३, उंडवडी २०.८

इंदापूर - भिगवण ५२.८, इंदापूर ४८.०, लोणी ५६.०, बावडा १६.३, काटी ४५.८, निमगाव ५७.३, अंथुर्णे ४५.३, सणसर ९०.५

दौंड - देऊळगाव २३.०, पाटस ६२.०, यवत २५.०, कडेगाव ३४.०, राहू १०.३, वरवंड ४१.८, रावणगाव १३.८, खामगाव १०.०, पारगाव १८.३,

बोरीपार्धी ३४.५,

पुरंदर - कुंभारवळण १०.५, परिंचे २१.८, राजेवाडी १३.५, वाल्हा १९.८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT