Baramati KVK  Agrowon
ॲग्रो विशेष

Baramati KVK : बारामती कृषी विज्ञान केंद्राला मधमाशी कार्यासाठी पुरस्कार

Annual Review Meeting : भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत अखिल भारतीय समन्वयित मधमाशी व परागीभवन करणारे कीटक प्रकल्पाची नुकतीच वार्षिक आढावा बैठक हिमाचल प्रदेशातील पालमपूर कृषी विद्यापीठ येथे घेण्यात आली.

Team Agrowon

Baramati News : भारतीय कृषी संशोधन परिषदेमार्फत अखिल भारतीय समन्वयित मधमाशी व परागीभवन करणारे कीटक प्रकल्पाची नुकतीच वार्षिक आढावा बैठक हिमाचल प्रदेशातील पालमपूर कृषी विद्यापीठ येथे घेण्यात आली.

त्या वेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राला मधमाशी कार्यासाठी पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार बारामती केव्हीकेचे पीक संरक्षण तज्ज्ञ डॉ. मिलिंद जोशी यांनी भारतीय संशोधन परिषदेचे पीक विज्ञान विभागाचे महासंचालक डॉ. टी. आर. शर्मा यांच्या हस्ते स्वीकारला.

या वेळी पीक संरक्षण व जैवसुरक्षा विभागाचे सहायक महासंचालक डॉ. पूनम जसरोटिया, पालमपूर कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नवीन कुमार, प्रकल्प समन्वयक डॉ. सुनील सुरोशे, राष्ट्रीय मधमाशी मंडळाचे संचालक डॉ. दास, डॉ. प्रदीप चुनेजा, डॉ. अतौर रहमान आदी उपस्थित होते.

या पुरस्कारासाठी अध्यक्ष राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. धीरज शिंदे यांनी आनंद व्यक्त करून अल्पेश वाघ, प्रशांत गावडे, सचिन क्षीरसागर व टीमचे अभिनंदन केले.

केंद्रामार्फत पुढील कालावधीत महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून मध उत्पादनाला चालना देण्याचे काम करण्याचा मानस आहे.
राजेंद्र पवार, अध्यक्ष, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट
संस्थेमार्फत विविध प्रशिक्षणे राबवून उद्योजकता विकासाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले आहे. त्याचा लाभ अनेक तरूण घेत आहेत.
नीलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT