Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ महामार्ग विरोधात बांदा ते चांदा शेतकरी आक्रमक, सांवतवाडीतून तीव्र विरोध

Sindhudurg Farmers : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे.

sandeep Shirguppe

Goa Nagpur Shaktipeeth Highway : गोवा ते नागपूर असा ८०५ किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर, सांगली, लातूर येथून प्रचंड विरोध होत आहे. यानंतर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. दरम्यान या महामार्गाला बांदा ते चांदा असा विरोध होताना दिसत आहे. दरम्यान याविरोधात उद्या (०४) एप्रिलला कोल्हापूर येथे मोठ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये यासह अन्य गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले.

काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार २८ मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या सर्व गावांमध्ये लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व गावांचा मिळून सावंतवाडी तालुक्याचा मेळावा घेण्याचे नियोजन आहे.

या अगोदर खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खाजगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले.

पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे. अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ञ काका भिसे, सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत, कोल्हापूरचे शेतकरी सुधाकर पाटील, के डी पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर जयसिंग पाटील हे सहभागी झाले होते. लवकरच या गावांच्या स्वतंत्र सभा व तालुका मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT