Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : कोंडिवरेतील वणव्यात केळी, ऊस पीक भस्मसात

Crop loss in fire : संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे लागलेल्या वणव्यात केळी, साबुदाणा, ऊस आदी चार एकरांतील लागवड भस्मसात होऊन सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

Team Agrowon

Sangameshwar News : संगमेश्वर तालुक्यातील कोंडिवरे येथे लागलेल्या वणव्यात केळी, साबुदाणा, ऊस आदी चार एकरांतील लागवड भस्मसात होऊन सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. उन्हाळा सुरू होताच माखजन कोंडिवरे भागात वणवे लागण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कोंडिवरे येथे गडनदीशेजारी केरळ राज्यातील निलंबत रवी या शेतकऱ्याने सुमारे चार एकर जमीन क्षेत्रात केळी, साबुदाणा, ऊस, बोड, फणस, अननस आदींची शेती केली आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून कोंडिवरे येथे ते विविध पीक घेत आहेत.

मंगळवारी (ता. २७) सकाळी कोंडिवरे गडनदी भागात अचानक आग लागली. हलका वारा असल्यामुळे या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. उन्हामुळे वाळलेले गवत आगीबरोबर वेगाने पेटत गेले. त्यामुळे आगीची तीव्रता वाढली.

हा वणवा वेगाने पसरत गेला. त्यामध्ये साबुदाणा, ऊस, केळी आदी लागवड क्षणात भस्मसात झाली. त्यामुळे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आरवली-माखजन परिसरात शेतकऱ्यांनी आंबा, काजू आदी फळझाडांची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सध्या या भागात वणवे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT