Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Farming : इंदापूरच्या शेतकऱ्यांची केळी पिकाला पसंती

Banana Plantation : इंदापूर तालुक्यातील साखर कारखान्याच्या पट्ट्यातील शेतकरी अधिक उत्पन्न मिळत असल्याने केळी पिकाकडे शेतकरी वळला आहे.

Team Agrowon

Pune News : दापूर तालुक्यातील साखर कारखान्याच्या पट्ट्यातील शेतकरी अधिक उत्पन्न मिळत असल्याने केळी पिकाकडे शेतकरी वळला आहे. आडसाली उसासाठी दीड वर्षाहून अधिक काळ जात असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकाचे पैसे मिळण्यास जास्तीचा कालावधी जात आहे.

परिणामी कमी कालावधीत उत्पादन मिळते. यामुळे केळीची गोडी शेतकऱ्यांना लागली आहे. उसाच्या एका पिकाच्या कालावधीमध्ये केळीची दोन पिके येत असल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे. तालुक्यातील सर्वाधिक उसाची लागवड होत असते. तालुक्यात तीन सहकारी व एक खासगी साखर कारखाना आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा कल नेहमीच उसाकडे आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात केळीच्या पिकातही प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र आहे. लागवडीपासून केवळ बारा महिन्याच्या आतच शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होत आहेत.

तसेच गेल्या काही दिवसांपासून केळीच्या पिकाची मागणी वाढली आहे त्यामुळे बाजारभाव होईल चांगले मिळत आहेत. याचा परिणाम म्हणून ऊस उत्पादक शेतकरी केळीच्या पिकाला पसंती देत आहे.

ऊस या पिकासाठी लागणारा कालावधी आणि मिळणारे उत्पन्न व केळी पिकात फरक असून उसाच्या दोन पिकांमध्ये केळीची तीन पिके निघत आहेत. तसेच सध्याचे बाजार भाव देखील चांगले आहेत. त्यामुळे बागायती पट्ट्यातील शेतकरी केळी लागवड करीत आहेत त्यामुळेच केळीच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
- किरण पिसाळ, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, इंदापूर.
उसासाठी होणारा खर्च जाणारा कालावधी व लागणारे पाणी याचा ताळमेळ केल्यास केळी पिकापेक्षाही जास्त होत आहे व केळी पिकात उसापेक्षा दुपटीचे उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे सध्या केळीचे क्षेत्र वाढवले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून बाजार भाव देखील टिकून असल्यामुळे हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून केळीकडे बघितले जात आहे.
- दादासाहेब भोसले, केळी उत्पादक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bajara Farming: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन; चांगल्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या गोष्टी

RBI MPC Meeting 2026: कर्जाचा हप्ता वाढणार नाही, पण कमी पावसामुळे महागाई वाढणार- आरबीआय गर्व्हनर

Modern Sowing Machines: पेरणीकरिता आधुनिक यंत्रांचा वापर

Crop Impact Management: विदर्भातील पर्जन्यमान अन् पिकांवरील परिणाम

Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू

SCROLL FOR NEXT