Banana Orchard Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Orchard Damage : वाशिंबे परिसरात वादळी वाऱ्याने केळी बागा जमीनदोस्त

सध्या केळीला उच्चांकी दर मिळत आहे. शेतकऱ्यांनीही मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने या बागा जोपासल्या आहेत.

Team Agrowon

Solapur Banan Loss News : करमाळा तालुक्यातील वाशिंबे परिसरात सोमवार (ता. ७) मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्यामुळे वाशिंबे शिवारातील काढणीस आलेल्या केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून, ऐन हंगामात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ ऊडाली, तसेच चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सध्या केळीला उच्चांकी दर मिळत आहे. शेतकऱ्यांनीही मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने या बागा जोपासल्या आहेत. अनेक ठिकाणी सध्या बागा फळावर आहेत.

काही ठिकाणी केळीची उतरणी सुरू आहे. असे असताना शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटामुळे हिरावला आहे.

या आधीच खते, बी बियाणे, औषधे मंजुरी यात गुंतवलेले भांडवल मिळवणे, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले असताना, या संकटाने त्यांच्या सर्व आशेवर पाणी फेरले आहे.

माळशिरस आणि मोहोळच्या काही भागांतही अशाच पद्धतीने वादळीवाऱ्याचा फटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT