Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : फळ पीकविमा योजना शेतकरीपूरक करा

Crop Insurance Scheme : डाळिंबाप्रमाणे केळीसही मृग बहरात विमा संरक्षण मिळायला हवे. यामुळे केळी उत्पादक आंबिया बहरामध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत केळीसाठी विमा संरक्षण घेतात.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात नेहमी फळ पीकविमा योजनेत केळी पीक विमाधारकांमध्ये तक्रारी व विमा योजनेत घोळ दिसतो. शेतकऱ्यांना बँका व अधिकारी वेठीस धरतात व त्यांच्या चुकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते, असा दावा शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील (गणपूर, ता. चोपडा) यांनी निवेदनातून केला आहे.

त्यांनी म्हटले आहे, की फळ पीकविमा योजनेत केळी विमाधारक शेतकरीच दोषी आहेत, असा आरोप केला जातो. पण वास्तव कुणी विचारतच घेत नाही. या योजनेतून केळी पिकासाठी फक्त एकदाच किंवा ऑक्टोबरमध्ये विमा संरक्षण घेण्याची परवानगी आहे. केळीची लागवड बारमाही केली जाते.

पण केळीला दोन हंगाम किंवा आंबिया व मृग बहरात विमा संरक्षण घेता येत नाही. द्राक्ष, डाळिंबाप्रमाणे केळीसही मृग बहरात विमा संरक्षण मिळायला हवे. यामुळे केळी उत्पादक आंबिया बहरामध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत केळीसाठी विमा संरक्षण घेतात. यात अनेक बँका शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून रक्कम कपात करून केळीसाठी विमा संरक्षण घेतात.

पण ज्या बँकांनी शेतकऱ्यांकडून पीकविमा हफ्ते कपात केले, पण लागलीच त्याची माहिती किंवा विमा संरक्षण घेतल्याचा डाटा त्याच दिवशी विमा कंपनीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली नाही. कारण बँकांना लागलीच ही माहिती पोर्टलवर अपलोड करण्याची परवानगी नव्हती. यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३००० शेतकऱ्यांचे विमा हप्ते बँकेत कपात झाले.

पण बँकांनी माहिती अपलोड केली नाही म्हणून त्यांचा विमा योजनेत सहभाग निश्चित झाला नाही. यात शेतकऱ्यांना भुर्दंड का? काही बँकांनी पीकविमा कंपनीकडे भरलेले पैसे परत घेऊन ते सरळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून आपली जबाबदारी झटकली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर चौकशीचे आदेश देऊन प्रश्नाला थोडी गती दिली आहे. पण कायमस्वरूपी मार्ग निघणे गरजेचे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT