Sugarcane Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : बळीराजा साखर कारखान्याचे ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing : यंदाच्या गाळप हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी पर्यंत सर्व सभासदांचा ऊस गाळपास आणला जाईल.

Team Agrowon

Parbhani News : कान्हडखेड (ता. पूर्णा) येथील बळीराजा साखर कारखान्याचा १० व्या गाळप हंगामाचा प्रारंभ बुधवारी (ता. १) कारखान्याचे संचालक दिनकरराव जाधव यांच्या हस्ते मोळी टाकून करण्यात आला.

यंदाच्या गाळप हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी पर्यंत सर्व सभासदांचा ऊस गाळपास आणला जाईल. त्यानंतर कारखाना परीसरातील सर्व बिगर सभासदांचा ऊस आणला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उसाची चिंता करु नये अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

यावेळी मदनराव वाघ, बाबुराव बोबडे, मारोती बखाल, ॲड. एम. ए. सईद, ॲड. सुरेश सूर्यवंशी, कारखान्याचे सरव्यवस्थापक भगवानराव मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चिफ केमिष्ट किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रिक मॅनेजर नितीन गणोरकर, अभियंता मदन देशमुख, ऊस पुरवठा अधिकारी विनायक कऱ्हाळे, रामजी शिंदे, मुख्य सुरक्षा अधिकारी विनायक कदम उपस्थित होते.

मागील हंगामात ५ लाख ७२ हजार २५३ टन ऊस गाळप करुन सरासरी ११.८० टक्के उताऱ्याने ६ लाख ७५ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन घेतले होते. त्यानुसार एफआरपी दर प्रतिटन २७६४.७० रुपये ऊस उत्पादकांना अदा करण्यात आली.

या हंगामात शेतकऱ्यांच्या उसाला पहिली उचल प्रतिटन २२०० रुपये देण्यात येईल त्यानंतर बैलपोळा सणासाठी दुसरा हप्ता व दिवाळी पूर्वी तिसरा हप्ता निघालेल्या एफआरपी दरा प्रमाणे शेतकऱ्यांना देण्यात येईल.

मागील गळीत हंगामा पेक्षा या वर्षीच्या गळीत हंगामासाठी एफआरपी दर अंदाजे निश्चित चांगला राहील, असे कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी सांगितले. सूत्रसंचालन माधवराव मोहीते यांनी केले तर आभार जगदीश जोगदंड यांनी मानले. शेतकरी, ऊसतोडणी वाहतूक ठेकेदार, पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT